
कोल्हापूर: मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संघाने अत्यंत दर्जेदार सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.
भारतीय विद्यापीठ महासंघाच्या वतीने मुंबईविद्यापीठात १० व ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीयआंतरविद्यापीठीय कव्वाली स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश व महाराष्ट्रया राज्यांतील एकूण दहा विद्यापीठांचे संघ सहभागीझाले. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळविला. आकर्षक चषक, प्रशस्तिपत्रक व रोखपंचवीस हजार रुपये असा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठ संघाने सादर केलेल्या कव्वालीचेसंगीत दिग्दर्शन सिद्धेश जाधव (मुंबई) व श्रीमतीसंपदा माने-कदम (मुंबई) यांनी केले. विजय जाधव वरवींद्र जाधव यांनी संगीत साथीदार म्हणून काम केले.
प्रिती मनवाडकर, प्रथम लाड, ऋषिकेश देशमाने,काजल नरूटे, केदार गुरव, संज्योती जगदाळे,निलंजय वड्डलवार, आदिती धनवाडे, जीवन पाटील,काजल धुर्वे या दहा जणांचा संघात समावेश होता. यासंघाचा सराव व व्यवस्था यासाठी विद्यार्थी विकासमंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, प्राचार्य डॉ.एस.आर. पाटील यांनी परिश्रम घेतले. संघव्यवस्थापक म्हणून डॉ.सुजित जाधव, सुरेश मोरेयांनी काम पाहिले. या यशाबद्दल कुलगुरू डॉ.देवानंदशिंदे, प्र-कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिवडॉ.विलास नांदवडेकर यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.
Leave a Reply