
कोल्हापूर: भा. रा भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या आपल्याच मातीतला एक सामान्य पण असामान्य व्यक्तिमत्त्वाचा आणि चौकस मुलगा अवघ्या महाराष्ट्राचा लाडका फास्टर फेणे चित्रपट स्वरूपात येत आहे. सत्तर ते ऐंशीच्या दशकातील भा. रा भागवत यांच्या कल्पनेतून फास्टर फेणे या कॅरेक्टरची निर्मिती झाली. मुलांच्या भावविश्वातील हा साहसी फास्टर फेणे चित्रपटरूपात येत आहे. मुंबई फिल्म कंपनीचे जिनिलीया आणि रितेश देशमुख यांची निर्मिती असलेला अजय सरपोतदार दिग्दर्शित आणि क्षितीज पटवर्धन यांच्या लेखणीतून साकारलेला फास्टर फेणे हा चित्रपट येत्या 27 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे .पुस्तक स्वरूपात असलेली कथा प्रेक्षकांना प्रत्यक्ष रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अशी माहिती निर्माते देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिल दोस्ती दुनियादारी यानंतर फास्टर फेणेची भूमिका करायला मिळते ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. अश्या भावना फास्टर फेणेच्या मुख्य भूमिकेत असणाऱ्या अमेय वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. तसेच चित्रपटात गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर,पर्ण पेठे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. फास्टर फेणे आत्तापर्यंत पुस्तकांतून मुलांच्या विश्वात होता पण चित्रपट बनवताना त्याचे वय थोडे वाढवले असून किशोरवयीन फास्टर फेणे चित्रपटामध्ये तरुण दिसणार आहे. ऐंशीचे दशक आणि आताचे जग याची उत्कृष्ट सांगड घालत प्रेक्षकांना हा चित्रपट पहायला नक्कीच आवडेल अशा रितीने बनवलेला आहे असा विश्वास संपूर्ण चित्रपटाच्या टीमने आज कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. चित्रपटाचे बहुचर्चित पार्श्वसंगीत ट्राय आणि आरिफ या संगीतकार जोडीने केले आहे. अतिशय उत्कृष्ट चित्रपट असल्याने झी स्टुडिओने या निर्मितीत सहभाग दर्शविला आहे. असे झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी यांनी सांगितले. मराठी चित्रपट आज एका विशिष्ट पातळीवर आहे त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या जीवनावरही मराठी चित्रपट लवकरच येणार आहे असे रितेश देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तरी प्रत्येक पिढीतील प्रेक्षकांचे मन जिंकून घेण्यात फास्टर फेणे हा चित्रपट सज्ज झालाय तो तुम्ही नक्की बघा असे आवाहन चित्रपटाच्या संपूर्ण टीमनेआज केले.
Leave a Reply