जिल्ह्यात ४३५ ग्रामपंचायतीसाठी आज ८४.९१ टक्के मतदान

 

कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतीसाठी आज ८४.९१ टक्के इतके मतदान झाले आहे. उद्या (मंगळवार) रोजी निकाल होणार आहे. जिल्ह्यातील सरपंच पदासाठी १२४९, सदस्य पदासाठी ८६२८ अशा एकूण ९८७७ उमेदवारांना हुरहूर लागून राहिली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात ९१.९० आणि पन्हाळा तालुक्यात ९१.७८ टक्के इतके मतदान झाले आहे. तर सर्वच सदस्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणूक मतमोजणीची जय्यत तयारी केली असून. मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.
जिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतींसाठी १६७९ प्रभागाकरिता मतदान झाले असून. ४७ सरपंच आणि ७०१ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित सदस्य, सरपंचपदासाठी ४२१ निवडणुक निर्णय अधिकारी, तर ५३५ सहायक निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. १८४२ मतदान केंद्रांसाठी एकूण १० हजार ६१२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच एकूण मतदान केंद्रांपैकी १७७ केंद्रे ही अतिसंवेदनशील असल्याने, त्या ठिकाणी अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सर्वच ठिकाणी चुरशीने मतदान झाले असून आता कोणाचे भाग्य उजाडणार हे उद्या निकाला नंतर स्पष्ट होणार आहे. जरी ग्रामपंचायतीची निवडणुक असली तरी या निवडणुकीच्या निकालावर लोकसभा आणि विधान सभेची गणिते अवलंबून असणार आहेत. त्यामुळे गावातील नेत्यांच्या बरोबरच जिल्ह्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. जिल्ह्यात एकूणच काही ठिकाणी अपवाद किरकोळ वादावादी वगळता शांततामय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!