
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचा सन 2018-19 करीता 8276 कोटी 9 लाख रुपयेचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा आज झालेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये नाबार्डाचे जिल्हा विकास अधिकारी नंदु नाईक यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याहस्ते प्रकाशित केला.
नाबार्डद्वारे दरवर्षी देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी तयार केला जाणारा संभाव्य वित्त आराखडा (PLP) हा महत्वाचा दस्ताऐवज असून याचा वापर केंद्र शासन, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये वित्त आराखड्याचा सुयोग्य वापर करुन जिल्ह्याची पतयोजना तयार केली जाते.
यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक पी.एस.पराते, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक एस.जी. किणिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाबार्डचे नंदु नाईक यांनी सादर केलेल्या संभाव्य वित्त पुरवठा आराखड्यामध्ये शेती व शेती पुरक क्षेत्रासाठी 4685 कोटी, सुक्षम, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 2646 कोटी 43 लाख आणि प्राथमिक क्षेत्रासाठी 944 कोटी 46 लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
शेती पुरक क्षेत्रासाठी प्रामुख्याने पीक कर्जासाठी 2857 कोटी 58 लाख, सिंचनासाठी 561 कोटी 40 लाख, शेती यंत्रिकीकरणासाठी 388 कोटी, दुग्ध व्यवसासाठी 426 कोटी 48 लाख, कुकुटपालानासाठी 35 कोटी, शेली-मेंढी पालनासाठी 38 कोटी, गोदामे आणि शितगृहांसाठी 117 कोटी 49 लाख, भुविकास आणि जमीन सुधारणेसाठी 60 कोटी 55 लाख, शेती माल प्रक्रिया उद्योगासाठी 100 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत.
इतर प्राथमिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गृह कर्जासाठी 567 कोटी, शैक्षणिक कर्जासाठी 162 कोटी इतका वित्त पुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे. तर महिला बचत गटासाठी सुमारे 62 कोटीचा विशेष वित्त पुरवठा प्रस्तावित केला आहे.
Leave a Reply