

या अल्बमचं नाव ‘उषाच्या ओव्या’ असं असून डॉ. उषा हिरानंदानी यांच्या ‘आरंभ’ नावाच्या फिलासॉफिकल काव्यसंग्रहातून त्यातील काही कविता घेण्यात आल्या आहेत. अमृता नातू आणि गौरव बांगिया यांनी यातली गाणी गायली असून संगीतही या दोघांनी दिले आहे. ही सर्व अाध्यात्मिक गाणी आहेत, पण धार्मिक नाहीत. म्हणजे कोणत्याही एखाद्या देवाची किंवा धर्माची ही गाणी नाहीत, असे अमृताने स्पष्ट केले. संतोष नायर यांनी या अल्बम ची अरेंजमेंट केली आहे.
सध्याच्या काळात जेथे फक्त लाऊड म्युझिकलाच भर दिला जातो त्या काळात दोन तरुण मुलं येतात आणि शांत, आध्यात्मिक गाणी देतात ही कौतुकाची बाब आहे. अमृता नातू आणि गौरव बांगिया यांना मनापासून शुभेच्छा… मेडीटेशनला बसल्यावर जसं संगीत ऐकलं जातं तसंच हे संगीत आहे.असे पं. सुरेश वाडकर यांनी सांगितले.
मी गाण्यांना चालही लावू शकते हा माझ्यासाठीही एक साक्षात्कार होता. या अल्बममध्ये एकूण सहा गाणी आहेत. संगीतकार म्हणून अनुभव सांगताना अमृता म्हणते, अनुभव खूप एक्सायटेड होता. गायिका म्हणून मी फक्त माझ्या आवाजावर लक्ष केंद्रीत करायचे, पण एक संगीतकार म्हणून मला ती कविता आधी जाणून घ्यावी लागली. त्यातलं मर्म जाणून घ्यावं लागलं. हा अनुभव खूप मजेदार असल्याचे अमृताने सांगितले.
Leave a Reply