
स्टार प्रवाहवरील ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘विठूमाऊली’ या दोनलोकप्रिय मालिकांचा २४ डिसेंबर रोजी महाएपिसोड होणार आहे. आतापर्यंत असलेल्या रंजक कथानकाची आणि त्यातल्या प्रश्नांचीउत्तरं या महाएपिसोडमध्ये मिळणार आहेत. या दोन्ही मालिकांचेमहाएपिसोड अनुक्रमे दुपारी १:०० आणि २:०० वाजता पाहतायेतील.
‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत मीरा आणि ऋषिकेश यांच्यातसंघर्ष सुरू आहे. आतापर्यंत मीरानं प्रत्येक गोष्ट ऋषिला हवी तशीकेली. ऋषि मात्र तिच्या मनासारखं वागत नसल्यानं मीरा चिडलेलीआहे. ऋषि मीराला धडा शिकवण्यासाठी एक डाव खेळतो. त्यालामीरा कशी सामोरी जाते, कायम खंबीरपणे पाठीशी राहिलेला साकेतमीरासाठी काय करतो, मीरा आपल्याकडे परत यावी ही साकेतचीइच्छा पूर्ण होते का या सगळ्या प्रश्नांचा उलगडा रविवारच्यामहाएपिसोडमध्ये होईल.
‘विठूमाऊली’ या पौराणिक मालिकेला महाराष्ट्रानं उत्स्फूर्त प्रतिसाददिला आहे. तिन्हीसांजेला विठूदर्शन होत असल्याने अल्पावधीतच हीमालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. विठ्ठलाला तुळस प्रिय काआहे, हे सत्य उलगडणार आहे या विठ्ठल पर्वात. २४ डिसेंबर रोजीहोणाऱ्या महाएपिसोडमध्ये तुळशीमहात्म्य पहायला मिळणार आहे. सत्यभामा ही कलीच्या प्रभावाखाली आहे. त्या प्रभावातून विठ्ठलतिला कशा पद्धतीनं मुक्त करतात हे महाएपिसोडमध्ये दाखवलंजाणार आहे.
अतिशय रंजक वळणावर आलेल्या ‘लेक माझी लाडकी’ आणि’विठूमाऊली’ या दोन्ही मालिकांत पुढे काय होणार हे जाणूनघेण्यासाठी नक्की पहा महाएपिसोड येत्या रविवारी म्हणजेच २४डिसेंबर रोजी दुपारी १:०० आणि २:०० वाजता आणि रात्री ८:००आणि ९:०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर
Leave a Reply