भारत व चीन भागीदारीतील नवीन उत्पादने बाजारात येणार

 

नवी दिल्ली : भारतीय आणि चिनी आयटी कंपन्यांमध्ये संयुक्‍तपणे भागीदारी करण्यासाठी नॅस्कॉम आणि चीनमधील दालियान शहर यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल आणि अन्य काही कंपन्या यापूर्वीच चीनमध्ये आहेत. भारतीय कंपन्यांना सहजपणे चीनमधील बाजारपेठेत उतरण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. भारतीय आणि चिनी कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचाही वापर करण्यावर भर देणार आहेत. सध्याच्या काळात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्र येत आहेत. भारती

य कंपन्यांचे सॉफ्टवेअर क्षेत्रात वर्चस्व असून चिनी कंपन्या हार्डवेअरमध्ये प्रगती करत आहेत. दोन्ही देश एकत्र आल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन उत्पादने दाखल करू शकतात, असे नॅस्कॉमचे संचालक गगन सभरवाल यांनी म्हटले.

या करारानुसार भारतीय कंपन्यांसाठी विशेष सुविधा देण्यात येईल. भारतीय कंपन्यांना ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने काम करता येईल. या सामंजस्य करारामुळे भारतीय स्टार्टअप कंपन्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!