
कोल्हापूर : पाळणाघर ही संकल्पना आज नोकरी व व्यवसाय करणार्या दाम्पत्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनत आहे. विभक्त कुटुंब पद्धती मुळे घरामध्ये कोणी प्रौढ व्यक्ती नसते. आर्थिक गरजा झपाट्याने वाढत असल्याने नवरा बायको दोघांनाही नोकरी करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे आपल्या मुलांना हवा तो वेळ देता येत नाही. मुंबई पुणे च्या धर्तीवर पालकांना पाळणाघराची गरज कोल्हापूरातही भासू लागली आहे. ही गरज ओळखून टेंडर टच फौंडेशनच्या वतीने अत्याधुनिक पाळणाघर ही संकल्पना साकारली आहे. या सेंटरचे उद्घाटन सोमवार दि. 25 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता आ. डॉ. सुजीत मिणचेकर, अरुंधती महाडिक, प्रतिमा पाटील या तिघांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या सेंटरमध्ये 1 वर्षापासून ते पूढे या वयोगटातील मुलांचा सांभाळ केला जाणार आहे. शिक्षण, संस्कार, आहारतज्ञांकडून योग्य आहार पाल्यांच्या बौद्धिक आणि शारिरीक विकासासाठी लागणार्या आवश्यक सोयी सुविधा तसेच मानसिक दृष्टया पाल्य प्रगल्भ व्हावे यासाठी बालमानसोपचार तज्ञ यांच्याकडून मार्गदर्शन प्रशिक्षितांकडून मुलांना योग्य मार्गदर्शन, आरोग्य तपासणी संस्कार वर्ग सूर्यनमस्कार तसेच योगाचे प्रशिक्षण टेंडर टच डे केअर सेंटर मध्ये दिले जाणार आहे. अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष नितीन राजशेखर उपाध्यक्ष स्मिता सावंत (मांडरे) डॉ. गीता पिल्लाई यांनी दिली. यावेळी सर्व विश्वस्त मंडळी उपस्थित होते.
Leave a Reply