राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारविरोधात भव्य मोर्चा

 

कोल्हापूर :सरकारने जनतेला अनेक आश्‍वासने दिली. पण त्या आश्‍वासनाची कोणतीही पुर्तता होताना दिसत नाही. ही सरकार कडून जनतेची फसवणूक आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात महाराष्ट् राज्य,राष्ट्वादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

 या प्रसंगी संग्राम कोते पाटील म्हणाले, भाजप सरकार सत्तेवर येवून चार वर्षे झाली. या काळात सरकारने कौशल्य विकास योजना, डिजिटल इंडिया, शेतकर्‍याची कर्जमाफी यासाऱख्या अनेक योजना सुरु केल्या. पण वास्तवामध्ये कोणतीच योजना यशस्वी झालेली नाही. सरकारने वर्षाला दोन कोटी युवकांना रोजगार देण्याच आश्‍वासन दिल. पण प्रत्येेकशात मात्र दोन हजार सुध्दा नोकर्‍या उपलब्ध झालेल्या नाहीत. 

 राष्ट्वादीचे युवक काँगे्रस प्रदेशउपाध्यक्ष नविद मुश्रीफ, माजी प्रदेशउपाध्यक्ष अदिल फरास, रोहित पाटील यांनी ही या प्रसंगी मनोगत व्यक्त केली.

 सरकारने विद्यार्थ्याना वेळेवर शिष्यवृत्ती द्यावी. गोरगरिब विद्यार्थ्याचे मोफत व सक्तीचे शिक्षण बंद करु नये. शिक्षणाचे खाजगीकरण करु नये. तसेच पेट्ोल, डिझेल, घरगुती गॅस याच्या दरवाढी रदद् करुन सवलतीच्या योग्य दरात उपलब्ध करुन द्यावेत. आदि मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.

 या मागण्यांची पूर्तता सरकारने लवकरात लवकर करावी. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अजित दादा आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मोठे जनआंदोलन केले जाईल, असा इशारा संग्राम कोते पाटील यांनी दिला आहे.

 यावेळी, राजेश लाटकर, अनिल साळोंखे, प्रसाद उगवे, ए.वाय. पाटील, रोहित पाटील, रविराज चौगुले, रविराज सोनुले आदि उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!