बाल तस्करीवर आधारित सिनेमा ‘टपकु’

 
आपल्या विषयामुळे चर्चेत असणारा हिंदी सिनेमा टपकुची शूटिंग मुंबईजवळील वसईत सुरु झाली आहे. वसईतील सुंदर ‘स्वाती बंग्लो’त सिनेमाची शूटिंग चालू आहे. येणाऱ्या काही दिवसात नालासोपारा आणि पालघमधील आउटडोर लोकेशन्सचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. मिळालेल्या महितीनुसार फक्त एकाच शेड्यूलमध्ये सिनेमाचं संपूर्ण शूटिंग करण्यात येणार आहे. टपकुच्या दिग्दर्शनाची धुरा अनुसिक पगारे संभाळणर आहेत.  पुण्यात जन्मलेले आणि वाढलेले दिग्दर्शक अनुसिक पगारे यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आणि FTII मधून आपलं शिक्षण  घेतला आहे. 

सध्या मुंबईजवळील वसईमध्ये त्याच्या आगामी सिनेमा ‘टपकु’ची शूटिंग सुरु आहे. चाईल्ड ट्रैफिकिंगवर आधारीत आणि अनुसिक यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या सिनेमात टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब किंवा भुथनाथ रिटर्न्स फेम पार्थ भालेराव पैकी एकाची वर्णी लावण्यात येणार आहे.तर सिनेमात दीपशिखा नागपाल, मिलिंद गुणाजी,  वीरेंद्र सक्सेना, गोरक्ष सकपाल आणि कौरवाकी वशिष्ठ सारखे कलाकार मुख्य भूमिकेत चमकणार आहेत.

 अर्थवी  क्रिएशन्स आणि अमेय प्रोडक्शंस  यांचा  बैनर असणाऱ्या टपकुमध्ये लहान मुलांची होणाऱ्या तस्करीवर प्रकाश टाकला आहे. देशात लहान मुलांची कशा प्रकारे जनवरांसारखी खरेदी-विक्री केली जाते हे या सिनेमात दाखवले जाणार आहे. दोन मुलींचे वडील असणाऱ्या अनुसिक पगरेंचा उद्देश 100 करोड कामविणारा सिनेमा बनवण एवढाच नाहीये तर टपकुमुळे एक जरी लहान मुलगा/ मुलगी बाल तस्कारांच्या तावडीतुन आपला जीव वचविण्यात यशस्वी होतोय तरी त्यांचा सिनेमा बनाविण्याचा उद्देश सफल होईल. सध्यातरी प्रेक्षकांना वर्षभर या सिनेमाची वाट पहावी लागणार आहे कारण टपकु 2019 ला सिल्वर स्क्रीनवर झळकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!