
कोल्हापूर: महाराष्ट्र शासन,डिपार्टमेंट ऑफ स्पोर्टस वेलफेअर ,युथ वेलफेअर यांच्याशी महाराष्ट्र स्टेटस लॉन टेनिस असोसिएशनचा करार होऊन कोल्हापूर च्या क्रिडा संकुलमधील टेनिस स्पोर्टसचे नुतनीकरण करण्यात आले आहे.नुतनीकरणानंतर याठिकाणी आजपासून महाराष्ट्र स्टेट लॉन असोसिएशनतर्फे आयोजीत सिनियर इंटरझोन टेनिस स्पर्धेला सुरूवात झाली. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते स्पर्धा सुरू झाल्या.क्रिडा संकुलचे नुतनीकरण झाले आहे आता याठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजीत करता येतील यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट राजीव देसाई, कौन्सिलर शितल भोसले,डॉ.सत्यवोरस सबनीस,डॉ.दिपक जोशी,मोहन घाटगे,केएसएचे सेक्रेटरी माणिक मंडलिक ,अध्यक्ष सरदार मोमीन आदी उपस्थित होते.
आज स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर-सोलापूर,नाशिक-औरंगा
कोल्हापूर विरूध्द सोलापूर अशी झाली यामध्ये कोल्हापूरचे राहूल सुवर्णा व पथ्वीराज इंगळे यांनी सोलापूरच्या शशांक माने व संदीप बलदोडी यांना ६/० ने हरविले.तर ९० प्लस गटामध्ये सोलापूरचे डॉ.अंतनूर. आणि हर्षा यांनी कोल्हापूरचे निंबाळकर व अजित कुलकर्णी यांना ६/१ ने हरविले.११० गटात सोलापूरचे राजीव देसाई व डॉ.प्रदीप कोनचूर यांनी कोल्हापूरचे शितल भोसले यांना ७/६(७/३) मध्ये हरविले.
नाशिक विरूध्द औरंगाबाद यांच्यात झाली.यामध्ये नाशिकच्या येती गुजराती व आदित्य राव यांनी औरंगाबाद चे मनिष सूर्यवंशी व डॉ.बशीर खान यांना ६/२ ने हरविले. तर नाशिकचे श्रीकांत कुमावट आणि किरण कुलकर्णी यांनी औरंगाबादचे मिरजा मसूद व पार्टनर मिनाज अन्सारीला ६/२ ने हरविले. ९० प्लसच्या गटात औरंगाबाद चे डॉ.अकरम खान आणि विजय महेर यांनी नाशिक चे अद्वैत अगाशे व पार्टनर मिलंद कले यांनी ६/० ने हरविले.
कोल्हापूर विरूध्द नागपूर यांच्यात झाली ११० गटात कोल्हापूर चे शितल भोसले व डॉ.शिंदे यांनी नागपूर चे शिवमोरे आणि उमेश श्री.सागर यांना ६/२ ने हरविले. ओपनमध्ये कोल्हापूरचे निलेश सावंत आणि मेहुल केनिया यांनी नागपूरचे रोहित शर्मा व राजेश मंदाडे यांना ६/२ ने हरविले.ओपन २ मध्ये कोल्हापूर चे राहूल सुवर्णा आणि पथ्वीराज इंगळे यांनी नागपूर चे रणजीत पाटील आणि सुनील भडंग यांना ६/० ने हरविले.
तर सोलापूर विरूध्द औरंगाबाद यांच्यात झाली. सोलापूर चे शशांक माने आणि संदीप बलदोडी यांनी औरंगाबाद चे मिरजा मसूद व पार्टनर मिनाज अन्सारीला ६/१ ने हरविले. तर ९० प्लस गटामध्ये औरंगाबाद चे डॉ अकरम खान विजय महेर यांनी सोलापूरच्या डॉ.अंतनूर आणि हर्षा यांना ६/३ ने हरविले.तर ११० गटात औरंगाबाद चे रूमी प्रिंटर व गोपाळ पांडे यांनी सोलापूरचे राजीव देसाई व डॉ .प्रदीप कोनचूर यांना ७/६(७/१) मध्ये हरविले.उद्या १८ रोजी नाशिक विरूध्द नागपूर, कोल्हापूर विरूध्द औरंगाबाद, सोलापूर विरूध्द नागपूर आणि कोल्हापूर विरूध्द नाशिक यांच्यात सामने होणार आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्राचे पाच झोन करण्यात आले आहेत.त्या पाचही झोनचे ४० निवडक स्पर्धक या टेनिसच्या सामन्यात सहभागी झाले आहेत.
Leave a Reply