
ठाणे : भारतीय दंत परिषदेच्या ठाणे शाखेने १७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०१५ च्या दरम्यान ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर रंगमंदिरात चौपनावी महाराष्ट्र राज्य दंत परिषद आयोजित केलेली आहे .यू – एक्स्प्लोर. इवोल्व. एक्सेल (YOU- EXPLORE. EVOLVE. EXCEL) अशी थिम असललेल्या ह्या परिषदेत ,संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे २५०० दंत शल्य चिकित्सक, विद्यार्थी, दंत प्रयोगशाळेतील कुशल तंत्रज्ञ तसेच दातांच्या दवाखान्यातील मदतनीस प्रतिनिधी भाग घेतील असा आयोजकांना विश्वास आहे . ह्या परिषदेचा उद्देश दंत क्षेत्रातील दंत शल्य चिकित्सक ,विद्यार्थी, तसेच तंत्रज्ञ व मदत्नीसांसाठी व्याख्याने,कार्यशाळा तसेच स्वस्थ मौखिक आरोग्य, तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची सामाजिक जागरूकता निर्माण करणे आहे. देशविदेशातील नामांकित दंत शल्य तज्ञ ह्या परिषदेत उपस्थित राहणार असून ते जमलेल्या प्रतिनिधीना मार्गदर्शन करतील. यावेळी दंत परिषदेत अनेकविध नवीन उपक्रम प्रथमच राबविण्यात येणार असून त्यात माहिती दंतक्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानावर व्याख्याने
इम्प्लांटस , रूट कॅनाल उपचारपद्धती treatmentsतसेच कॉस्मेटिक dentistry वर विशेष चर्चासत्र डेंटल क्लिनिकस मधील व्यवस्थापन कौशल्य , प्रशासकीय प्रणाली तसेच डेंटल चेअर व उपकरणांची निगा व देखभाल या विषयांवरील व्याख्याने Edufair – उपचार पद्धतीमधील छोटेखानी कार्यशाळा १९ विविध दंत विषयांवरील कार्यशाळा (प्री-कॉन्फरन्स कोर्सेस)
१६ व १७ डिसेंबर ला दंत विद्यार्थ्यासाठी करीअर कौन्सेलिंग, पेपर व पोस्टर प्रेझेन्टेशन , वादविवाद स्पर्धा ,सांस्कृतिक कार्यक्रम दंत मदतनीसा साठी विशेष व्याख्याने , कार्यशाळा दंत क्षेत्रातील विविध औषधे,उपकरणे, चेअर्स , दंत उपचारासाठी लागणारे मटेरीअल तयार करणाऱ्या , देशविदेशातील नामांकित कंपन्या देखील या परिषदेत सहभागी होणार असून आपल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन प्रतिनिधींच्या माहितीसाठी भरविणार आहेत. ह्या परिषदेची समग्र माहिती www.54thmsdc.org ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असून संपूर्ण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त दंत शल्य चिकित्सक,विद्यार्थी, दंत प्रयोगशाळेतील कुशल तंत्रज्ञ तसेच दातांच्या दवाखान्यातील मदतनिसांनी ह्या परिषदेत सहभागी व्हावे व आपल्या दंत ज्ञानांत भर घालावी असे आवाहन भारतीय दंत परिषदेच्या ठाणे शाखेने केलेले आहे.
Leave a Reply