उपलब्ध पुरावे व इतिहास यांच्याशी खेळ करू नका: अॅड रमेश कुलकर्णी

 

IMG_20151129_185306
कोल्हापूर : उपलब्ध पुरावे व इतिहास याच्याशी खेळ करू नका असे परखड मत आज वक्ते अॅड रमेश कुलकर्णी यांनी शोध अंबाबाईचा भाग ३ या व्याख्यानात बोलताना मांडले. कोल्हापूरची अंबाबाई ही नक्की कोण आहे याचा शोध घेण्यासाठी अंबाबाई भक्त मंडळ यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन केले होते. पार्वती हिच्या नावाने कधी मंदिर असत नाहीत.पण तिची जी रूपे आहेत ती म्हणजे दुर्गा,काली,महामाया महादेवी अश्या तिच्या रूपांची मंदिरे संपूर्ण भारतात आहेत.याला पुरावे आहेत.अंबाबाई ही आदिमाया आहे.आदि म्हणजेच अनादिकालापासून आणि मूलतः जी आहे अशी ती आदिमाया पार्वतीचे रूप आहे.ती विष्णू पत्नी नाही तर अंबाबाई ही आई आहे.विष्णू संप्रदाय आणि शिव संप्रदाय असे दोन प्रकारच्या मंदिरांचे वर्गीकरण झाले.शिवाची मंदिरे आणि दुसरी विष्णू परिवाराची मंदिरे भारतात वेगवेगळी आहेत. शिवाचा परिवार म्हणजे त्याची पत्नी पार्वती.तसेच पार्वतीच्या परिवारातील सर्व सदस्यांची मंदिरे.कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरातही नंदी,गणपती,कार्तिकेय,शिव,सरस्वती यांची मंदिरे आहेत.अंबाबाईची चतुर्भुज मूर्ती म्हणजेच चार हात असणारी मूर्ती आहे.जिच्या हातात शस्त्रे म्हणजे गदा,ढाल म्हणजेच खेटक आहे.गदेच्या पूर्वीचे शस्त्र म्हणजेच खट्वांग आहे.पार्वतीच्या सर्व रूपातील देवींच्या हातात शस्त्र असते जसे अंबाबाईच्या हातात आहे.तिच्या हातात कमळ नाही.म्हणून ती विष्णू पत्नी लक्ष्मी नाही.विष्णू पत्नी लक्ष्मीचा जन्म झाला होता.पण आदिमाया हिचे अस्तित्व आधीपासूनच आहे.जिचा जन्मच झाला नाही.अशी आदिमाया महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई.ही देवी पार्वतीचे रूप आहे.या जगात आधी स्त्री जन्मास आली.म्हणूनच अंबाबाई ही सर्वांची आई आहे.तिनेच सर्वांना निर्माण केले आहे.विष्णू पत्नी लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून झाला.तिने विष्णूला आपला पती मानले.शंकर याने समुद्र मंथनातील विष प्राशन केले.शंकर आणि पार्वती यांचे अस्तित्व आधीपासून आहे.म्हणूनच महालक्ष्मी हीच आदिमाया,अंबाबाई आणि पार्वतीचे राक्षसांचा संहार करण्यासाठी घेतलेले रूप आहे.
लोकांनी अंबाबाई ही लक्ष्मी आहे हा गैरसमज काढून टाकावा.चुकीचा इतिहास मांडून लोकांची दिशाभूल करू नये. असेही त्यांनी सांगितले.यावेळी मूर्तीवरील नाग त्वरित घडवावा यासाठी शासनाने समिती स्थापन करावी,अंबाबाई याच नावाचा उल्लेख व्हावा,मंदिराचे बाजारीकरण थांबविण्यासाठी आणि अर्पण दक्षिणेचा वापर योग्य व्हावा यासाठी ठोस पाऊले उचलावीत अश्या मागण्या यावेळी भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आल्या.यावेळी कार्यवाह दिलीप पाटील.सहकार्यवाह वसंतराव मुळीक इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्यासह मान्यवर आणि प्रेक्षक मोठ्या संख्यने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!