
कोल्हापूर : शहरातील मालमत्तांवरील कर रचना सुधारणेसाठी महापालिकेने नवा प्रस्ताव आणला आहे. हा प्रस्ताव आज मंगळवार दि. २० रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. या प्रस्तावानुसार रहिवाशी मालमत्तांच्या करात १० ते २० टक्के, व्यावसायिक गाळ्यांसाठी २० ते ३० टक्के आणि भाड्याने दिलेल्या मिळकतींसाठी हाच दर दुप्पट करण्याचा हा प्रस्ताव असून, शहरवासीय घरफाळ्याच्या ओझ्याखाली दबणार आहेत, आधीच महागाईच्या खाईत लोटलेल्या सर्वसामान्य जनतेवर लादण्यात येणारा अन्यायकारक घरफाळा दरवाढीचा प्रस्ताव तातडीने मागे घ्या, अन्यथा शिवसेनेशी गाठ असल्याचा, असा सज्जड इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून प्रस्तावित घरफाळा दरवाढी विरोधात शिवसेनेच्या सेनेच्या वतीने आज कोल्हापूर महानगरपालिका येथे निदर्शने करण्यात आली.
यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “घरफाळा दरवाढीचा प्रस्ताव ठेवणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो”, “अन्यायकारक घरफाळा दरवाढ प्रस्ताव रद्द झालाच पाहिजे”, “महापालिका प्रशासन हाय हाय” अशा घोषनाणी महानगरपालिका परिसर ददाणून सोडला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर शहरात सरासरी दीड लाखांवर मिळकती आहेत. यातील व्यापारी मिळकतींची संख्या २५ हजारांवर असून एकूण मिळकतीपासून महापालिकेला वार्षिक ४२ कोटी रुपये घरफाळ्याचे उत्पन्न मिळते. या उत्पन्नामध्ये व्यापारी आस्थापनांकडून महानगरपालिकेने गेली काही वर्षे अन्यायकारकरितीने घरफाळा आकारणी केल्यामुळे शहरातील अनेक हजारो व्यापारी मिळकती भाडेकरूंशिवाय मोकळ्या पडल्या आहेत. वाढीव घरफाळ्यामुळे मोठ्या कंपन्या कोल्हापुरात येत नाहीत आणि नव्याने केलेल्या बांधकामात व्यापारी गाळ्यांची विक्रीही होत नाही. कोल्हापूर महानगरपालिकेला शहरातील दुकानगाळे, ऑफिसेस यांच्यासारख्या व्यापारी आस्थापनांवर घरफाळ्याची आकारणी करताना अन्याय करण्यात आला आहे. तथापि, घरफाळ्यातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाचा आकडा कायम ठेवण्यासाठी व्यापारी आस्थापनांच्यावरील करामध्ये कपात सुचवून निवासी आस्थापनांवर करवाढ करण्याच्या प्रस्ताव महानगरपालिका सादर करणार आहे. यामुळे एका समूहावरील अन्याय दूर करण्यासाठी शहरातील सर्वसामान्यांवर अन्याय करण्याची नवी पद्धत विकसित केली जात आहे.
सर्वात जास्त घरफाळा आकारणारी महापालिका अशी परिस्थिती कोल्हापूर महानगरपालिकेची आहे. भारांक, मालमत्ता कराच्या नावाखाली अतिरिक्त करवाढ करण्यात येत आहे. सर्वसामान्य जनतेकडून नियमबाह्य पद्धतीने हुकुमशाहीने घरफाळा वसूल करणे आणि घरफाळा दरवाढ करणे अन्यायकारक आहे.
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या प्रयोगात शहरात निवासी विरुद्ध व्यापारी मिळकतधारक यांच्यामध्ये वाद लावण्याचा कुटील डाव महानगरपालिका प्रशासनाकडून या प्रस्तावा आडून करण्यात येत आहे. गतवर्षीही अशाच पद्धतीने महापालिका प्रशासनाने घरफाळा दरवाढ करण्याचा डाव आखला होता. यास शिवसेने कडाडून विरोध केल्याने प्रशासनाने ही दरवाढ मागे घेतली. प्रशासनाकडून नागरिकांची होणाऱ्या लुटीस शिवसेनेने नेहमी विरोध केला असून, प्रस्तावित केलेल्या घरफाळा दरवाढीमुळे शहरवासियांचे कंबरडे मोडणार आहे. महानगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या घरफाळा दरवाढीस महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांसह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी पाठींबा देऊ नये. प्रशासनाने हुकुमशाहिने ही दरवाढ केल्यास तीव्र आंदोलन उभे करू. तरी शहरवासीयांवर लादण्यात येणारा अन्यायकारक घरफाळा प्रस्ताव तातडीने मागे घ्या अन्यथा गाठ शिवसेनेशी असल्याचा, इशारा आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास दिला.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गटनेता नियाज खान, नगरसेविका सौ. प्रतिज्ञा निल्ले, नगरसेवक अभिजित चव्हाण, नगरसेवक अशोक जाधव, महेश उत्तुरे आदी शिवसेना शिष्टमंडळाने कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्याकडे घरफाळा दरवाढ प्रस्ताव मागे घेण्याबाबत निवेदन सादर केले.
या मोर्चामध्ये शिवसेना महिला आघाडी शहरसंघटक सौ.मंगल साळोखे, सौ. पूजा भोर, सौ.गीता भंडारी, सौ. गौरी माळतकर, सौ. मंगल कुलकर्णी, कु.रुपाली कवाळे, सौ. सोनाली पेडणेकर, सौ. पूजा कामते, सौ. शाहीन काझी, सौ. मीना पोतदार, दीपक गौड, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, रघुनाथ टिपुगडे, विशाल देवकुळे, अनिल पाटील, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, रमेश खाडे, दीपक चव्हाण, अमित चव्हाण, संजय गांधी योजनेचे किशोर घाटगे, फेरीवाले सेनेचे शहरप्रमुख धनाजी दळवी, अश्विन शेळके, मंदार तपकिरे, शाम जाधव, राजू काझी, निलेश गायकवाड, विद्यानंद थोरवत, मुन्ना तोरस्कर, सागर घोरपडे, सुहास डोंगरे, रविंद्र सोहनी, बंडा माने, अशोक माने, विक्रम पवार, सचिन भोळे, शशिकांत रजपूत, मोहन चौगुले, युवा सेनेचे पियुष चव्हाण, अविनाश कामते, ओंकार परमणे, कपिल सरनाईक, शैलेश साळोखे, विश्वदीप साळोखे, योगेश चौगुले, गुरु लाड, संतोष रेवणकर, आदी शिवसेना पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply