
कोल्हापूर: भविष्यात वैद्यकीय क्षेत्राला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. गोष्टी खूप वेगाने बदलत आहेत. आधुनिकता, सुरक्षितता, प्रशासन,वैद्यकीय शिक्षण यात बदल होणे गरजेचे आहे.डॉक्टरांनी काम करताना आपल्या कक्षा रूंदावणे आवश्यक आहे अशी अपेक्षा राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केली. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आयोजित हॉस्पिकॉन 2018 परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
हॉस्पिकॉनसारख्या परिषद कोल्हापूर जिल्ह्यात
वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थापन हा विषय कधीच शिकवला जात नाही किंवा अभ्यासला जात नाही. एखादे हॉस्पिटल उभे करताना हॉस्पिटल बांधकामापासून त्यांची दुरुस्ती मशिनरी खरेदी व वैद्यकिय सेवा उपलब्धता यासंदर्भात येणाऱ्या अडचणी, सहकार्यांचे सहकार्य, कर्मचारी व्यवस्थापन,अग्निशमन व्यवस्थापन, वैद्यकीय विमा आणि दिवसेंदिवस नवीन येऊ घातलेले कायदे आणि समाजाच्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून वाढत चाललेल्या अपेक्षा अशा अनेक गोष्टींची संलग्न राहावे लागते. तसेच गुणवत्ता प्रमाणपत्र, वैद्यकीय कचरा निर्मूलन वैद्यकिय जल व प्रदूषण व्यवस्थापन,इन्फेक्शन कंट्रोल हॉस्पिटल सेवा, वैद्यकीय परवाने या गोष्टीची माहिती कोणत्याही मेडिकल कॉलेजमधून किंवा याचे ज्ञान अनुभव दिला जात नसल्याने त्यातच वैद्यकीय कायदे , न्याय वैद्यकीय संदर्भ, ग्राहक कायदे याबाबत जागरूक राहावे लागते. याचा विचार करून कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने हॉस्पिकॉन 2018 या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे असा उद्देश असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.रविंद्र शिंदे आणि परिषदेतचे मुख्य डॉ.दीपक जोशी यांनी विषद केला.
यावेळी विविध विषयांवर तज्ञ डॉक्टर तसेच कायदे तज्ञ यांनी मार्गदर्शन केले .यामध्ये जे डॉक्टर आपली प्रॅक्टिस कायद्याच्या चौकटीत राहून करतात त्यांच्या बाजूने कायदा नेहमीच असतो.डॉक्टरांची चूक नसतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतात. रुग्ण मृत होण्याची कारणे वेगळी असतात पण डॉक्टरांना नेहमी जबाबदार धरले जाते.यात काही वेळा त्यांना नुकसान भरपाई देखील द्यावी लागते.यात डॉक्टरांनी देखील आपली जबाबदारी पाळली पाहिजे. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असेल तर रुग्ण आणि नातेवाईक यांना त्याची कल्पना द्या, कागदपत्रांची योग्य पूर्तता करणे, रुग्ण व नातेवाईक यांची संमती घेणे आवश्यक आहे अशी अपेक्षा डॉ. संतोष काकडे यांनी व्यक्त केली. डॉक्टरांवर दाखल होणारे दावे, खटले यावर त्यांनी आज उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कोल्हापूर: मुल्य आणि तत्वे पाळा कारण समाज याच गोष्टींवर तुम्हाला ओळखणार आहे असे मत गव्हर्नर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ व्यंकटेश मेटन यांनी व्यक्त केले. डॉक्टरांनी आपली वैद्यकीय जबाबदारी पार पाडत असताना वेळेचे नियोजन कसे करावे तसेच ताण तणाव यापासून दूर कसे रहावे यावर त्यांनी भाष्य केले.डॉक्टरांच्या राहणीमाना बद्दल अधिक बोलताना डॉ. मेटन म्हणाले” डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्यासारख जगता आले पाहिजे. कमीत कमी गरजा ठेऊन दुसऱ्याशी स्पर्धा करू नये. येणाऱ्या पिढीसाठी कमवून ठेवण्यापेक्षा त्या पिढीला चालना द्या.आपले उद्दिष्ट ठरवा ते साध्य करण्यासाठी रुग्णाबरोबर स्वतः ची ही काळजी घ्या.
डॉक्टरांविषयी कोणते कायदे आहेत,रुग्ण हॉस्पिटल मध्ये दगावला तर डॉक्टरांची यात सुरक्षितता काय असेल ,रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संबंध कसे असावेत याबद्दल पुण्यातील ऍडव्होकेट आणि डॉ.मनीष माचवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी असोसिएशनचे सचिव डॉ. संदीप साळोखे,, शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील,डॉ. दिलीप पाटील,डॉ. अजय शिंदे, डॉ. सरोज शिंदे, डॉ. गीता पिलई, डॉ.राजेंद्र वायचळ, डॉ. अजित लोकरे,डॉ. सुरज पवार यांच्यासह कोल्हापूर सह कोकण, उत्तरांचल, बेळगाव, सांगली, सातारा, रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्र येथून 500 हुन अधिक तज्ञ आणि डॉक्टर्स उपस्थित होते.
Leave a Reply