
कोल्हापूर: ईश्यान्य भारतातील चार राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यापैकी त्रिपुरा व नागालँड या राज्यात प्रथमच भारतीय जनता पार्टी ची सत्ता स्थापन झाली या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौक यथे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, सरचिटणीस अशोक देसाई, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्या उपस्थितीत साखर व पेढे वाटून तसेच फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना नाम.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, ईशान्य भारतातील भाजपा ची सत्ता येणे हे खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या विकासाचे फळ आहे. “सबका साथ, सबका विकास,” हा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदीनी संपूर्ण देशामध्ये सामान्य नागरिकाचे, गोर गरीब शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावेल याचा ध्यास घेत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक राजकारणातून संपूर्ण देशामध्ये विकासाची गंगोत्री आणली आहे. स्वातंत्र्या नंतर ईश्यान्य कडील सात राज्ये सातत्याने दुर्लक्षित राहिली होती परंतु मोदीजींनी या राज्याकडे विशेष लक्ष देऊन पायाभूत सुविधा, नवीन रोजगार, सेंद्रिय शेती इत्यादी रचनात्मक कामातून येथील नागरिकांना उज्वल भविष्याची खात्री दिली. तसेच या दैदित्यमान निकालासाठी ईशान्य भारतातील नागरिकांना धन्यवाद व्यक्त केले.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई सयाजी आळवेकर, सुरेश जरग, दिलीप मेत्राणी, हितेंद्र पटेल, संदीप कुंभार, संतोष माळी, राजू मोरे, अक्षय मोरे, विजय अगरवाल, नचिकेत भूर्के, विजयमाला जाधव, वैशाली पोतदार, विवेक वोरा, विवेक कुलकर्णी, संतोष माळी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply