
रांची :(राजा मकोटे,सुभाष माने ) भारतातील सर्व राज्यातील पत्रकारांची प्रातिनिधिक संघटना असणाऱ्या नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट (इंडिया) च्या १९व्या राष्ट्रीय द्वैवार्षिक अधिवेशनासाठी भारतातील विविध प्रांतातून पत्रकार दाखल झाले आहेत.दिनांक १०व११ मार्च रोजी झारखंड ची राजधानी रांची चे जुळे शहर असलेल्या खेलगांव च्या अतिभव्य अशा आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा क्रिडानगरीत हे अघिवेशन सपन्न होत आहे.या परिसरास डॉ..नंदकिशोर ट्रिखा नगर असे नांव देण्यात आले आहे.अधिवेशऩाच्या पुर्वसंध्येला जम्मू काश्मीर, केरळ, पश्चीम बंगाल, कोलकत्ता,बंगलूर सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पत्रकार, संपादक, कार्यकारी संपादक, व निमंत्रित दाखल झाले आहेत.महाराष्ट्रातून या संघटनेचे मार्गदर्शक शिवेंद्रभाई, राज्य महासचिव शितल करदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३५प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
या दोन दिवसाच्या परिषदेत राज्य व केंद्र सरकारकडून माध्यमाच्या अपेक्षा आणि महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र शासनासह इतर राज्यातील जिल्हापातळीवरील दैनिकांच्या शासकिय जाहिराती बंद न करता त्यामध्ये वाढ करावा असे ठराव केले जाणार आहेत.आजच्या राष्ट्रीय नियामक सभेत या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.एकंदरित भारताच्या पत्रकार विश्वाचे दर्शनच एनयूजे इंडिया च्या विविध चर्चेतून या अधिवेशनात प्रकर्षाने दिसून येणार आहे.त्यामुळे समस्त पत्रकार विश्वासह राजकिय नेतेमंडळी, माध्यम अभ्यासकांसह याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
Leave a Reply