भाजपची १ कोटीची विक्रमी सभासद नोंदणी पूर्ण

 

कोल्हापूर : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या आर्शिवाद चला देऊ मोदींना साथ” या घोषवाक्याने महाराष्ट्रात भाजपाने विधानसभा निवडणुकीची सुरुवात केली व त्यास यश मिळून महाराष्ट्रात भाजप सरकार स्थापन झाले तसेच आज १ कोटी भाजपचे सदस्य पूर्ण करण्यात यश मिळवले. संपूर्ण देशामध्ये १० कोटी भाजपचे सदस्य करणे हे लक्ष ठेऊन हे अभियान सुरु करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राचे उद्दिष्ट १ कोटी सभासद इतके निश्चित करण्यात आले होते. आज संपूर्ण देशात जवळपास १० कोटी सदस्य नोंदणी पूर्ण झाली असून आजच्याच दिवशी महाराष्ट्र प्रदेश भाजपने अधिकृतरित्या १ कोटी सभासद नोंदणी पूर्ण झाल्याचे जाहीर केले. हा विक्रम असून ऐवढ्यामोठ्या प्रमाणात आम जनतेमध्ये जाऊन सभासद करणे व त्यास पक्षाशी जोडणे असा अद्वितीय पक्षीय कार्यक्रम महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व जिल्ह्यातील नेत्यांनी पूर्ण करून दाखवला. या निमित्त सर्व आज आनंदोत्सव साजरा करत साखर पेढे वाटण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, संघटन महामंत्री बाबा देसाई, सरचिटणीस संतोष भिवटे, प्रदेश सदस्य अॅड. संपतराव पवार, विजय जाधव, मारुती भागोजी, युवा अध्यक्ष संदीप देसाई, भारती जोशी, किशोरी स्वामी यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!