
कोल्हापूर: राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जोपासणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या कार्य कर्तृत्वाचा यतोचित नागरी सत्कार व चार चाकी गाडी प्रदान सोहळा येत्या शनिवारी १५ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे होणार आहे. यावेळी श्रीमंत शाहू महाराज तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांचे प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती बाबुराव रानगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा महासंघ, राजर्षी शाहू जन्मस्थळ जतन व विकास समिती, राजर्षी शाहू सलोखा मंच, शिवनागरी पतसंस्था, विद्युत श्रमिक संघटना, पायोनियर एज्युकेशन सोसायटी, मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट, सदिच्छा युवक संघटना, प्रमिलाराजे रुग्णालय बचाव समिती इत्यादी संस्थांचे पदाधिकारी म्हणून वसंतराव मुळीक यांनी काम केले आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी अथक परिश्रम घेतले. याचीच पोचपावती म्हणून हा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत शशिकांत पाटील, शैलजा भोसले, दीपा डोले, संयोगिता देसाई वि.के. पाटील उपस्थित होते
Leave a Reply