
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) ‘दूध उत्पादक शेतकरी हाच आत्मा आहे. त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्यक्रम,हे आमच्या कारभाराचे सूत्र आहे. आम्ही सत्तेत आल्यापासून आजपर्यंत सहा वेळा दूध खरेदी दरामध्ये वाढ केली. म्हैस दुधाला प्रति लिटर ८ रुपये तर गाय दुधाला ९ रुपये इतकी ऐतिहासिक वाढ दिली. निवडणुकीच्या कालावधीत आम्ही शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता, त्याची पूर्तता करू शकलो याचा मनस्वी आनंद आहे. दुधाला चांगला भाव मिळू लागल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढला.” अशा भावना माजी ग्रामविकासमंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या.गोवत्स द्वादशी म्हणजेच ‘वसुबारस’ने शुक्रवारी दिवाळी सणास प्रारंभ झाला. यानिमित्त ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात गाय-वासरांचे पूजन करुन, गोडधाड पदार्थांचा नैवेदय दाखविण्यात आला. माजी ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते व संघाचे चेअरमन विश्वास पाटील तसेच संचालक मंडळाच्या उपस्थित गाय-वासरांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गाय दूध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित महिला दूध उत्पादकांच्या हस्ते गाय वासराचे पूजन झाले.“आपल्या संस्कृतीची जपणूक तसेच उत्तम पशुसंवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने गोकुळमार्फत वसुबारस कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.”अशा शब्दांत मुश्रीफ यांनी दिवाळीच्या शुभेच्या दिल्या
Leave a Reply