केंद्र सरकारच्या योजनेतून १०५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

 

कोल्हापूर: देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध घटकांना आवश्यक अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. आरोग्य क्षेत्रामध्ये देखील अशा योजनांचा लाभ समाजातील गोरगरीब जनतेला उपयुक्त ठरत आहे. आज कोल्हापूर येथे अथायू हॉस्पिटलमध्ये मुळच्या पिंपळगांव गारगोटी येथील असणाऱ्या परंतु गेली अनेक वर्षे रुईकर कॉलनी चांदणी नगर परिसरातील राहणाऱ्या यल्लुबाई मंगल या तब्बल 105 वय असणाऱ्या वृद्ध महिलेवर खुब्याची व मांडीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अस्थिरोग तज्ञ डॉ जितेश्वर कपाले, डॉ अनिल नायकवडी तसेच भूल तज्ञ टीना गांधी यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. या परिवाराला केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा राजारामपुरी मंडल अध्यक्ष रवींद्र मुतगी यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!