
कागल:५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदान मिळण्यासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा सत्कार शेतकऱ्यांच्या हस्ते झाला. कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी केलेल्या या कृतज्ञतापर सत्काराने आमदार श्री. मुश्रीफ भारावले.
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, याआधीच्या महाविकास आघाडी सरकारने थकीत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ आणली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नियमितपणे कर्जफेड करणा-या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदान देण्याचे घोषित केले होते. दरम्यान; कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे ते देता आले नव्हते. त्यानंतर अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्पीय भाषण करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच एक जुलै २०२२ रोजी कृषी दिनाच्या औचित्यावर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. ही घोषणा करून तेवढ्या रक्कमेची पुरवणी मागणीही त्यांनी मंजूर करून घेतली होती. दरम्यान; ३० जून २०२२ रोजी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यामुळे हे अनुदान देता आले नव्हते. त्याच पुरवणी मागणीचे पैसे आता या शासनाकडून दिले जात आहेत. दरम्यान; आलेले हे अनुदान ५० टक्केच शेतकऱ्यांना दिले आहे. उर्वरित ५० टक्के शेतकऱ्यांनाही तात्काळ अनुदान मिळाल्याशिवाय त्यांचीही दिवाळी गोड होणार नाही. त्यामुळे, त्यांच्या खात्यावरही दिवाळीपूर्वी तात्काळ पैसे जमा व्हावेत.
*”जरुरत से ज्यादा इमानदार……”*
भाषणात कुणाचेही नाव न घेता आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे डिजिटल बोर्ड लावून श्रेय घेण्यापेक्षा कामास काम उभे करा आणि विधायक पद्धतीने आव्हान द्या. जरुरतसे ज्यादा इमानदार हुं मै, इसीलिए बहुत लोगों के नजरोमें गुन्हेगार हूॅ मै…….!व्यासपीठावर मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, शिरीष देसाई, रघुनाथ कुंभार, नामदेवराव एकल, देवानंद पाटील, दीपक देसाई, नेताजी पाटील, मारुतीराव घोरपडे, बाळासाहेब देसाई, ॲड. अरुण पाटील, सूर्यकांत पाटील, दत्ता पाटील आदी उपस्थित होते.स्वागत राष्ट्रवादीचे कागल तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी केले. प्रास्ताविक माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल भोपळे यांनी केले. आभार सदानंद पाटील यांनी मानले.
Leave a Reply