तारदाळ  येथे गोकुळ शॉपी चे उदघाटन

 

कोल्हापूर:.हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे पंचरत्न या  गोकुळच्या दूध व दूग्धपदार्थ शॉपीचे  उद्‌घाटन गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे यांच्या शुभहस्‍ते व जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रसाद खोबरे यांच्या उपस्थित संपन्न झाले.

    यावेळी बोलताना संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे म्हणाले कि गोकुळने आपल्या गुणवतेच्या जोरावरती आपल्या ग्राहकांना भुरळ घातली आहे. दिवसेंदिवस गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्रामीण भागातून मोठया प्रमाणात मागणी येत आहे. भविष्यात ग्रामीण भागात जास्तीत जास्त गोकुळ शॉपी चालू करण्याचा मानस असून गोकुळच्या उत्‍पादनांचा अस्‍वाद ग्रामीण भागातील ग्राहकांनी घ्‍यावा असे मनोगत व्यक्त केले.

गोकुळ दूध,तूप,पनीर,दही,ताक,लस्सी,श्रीखंड सर्व पदार्थ उपलब्ध आहेत. तसेच परिसरातील नागरिकांना उपलब्ध ठेवले आहेत.याकार्यक्रम प्रसंगी  स्वागत व प्रस्ताविक शॉपी धारक अश्विनी खांडेकर यांनी केले व आभार श्रावण खांडेकर यांनी मानले.यावेळी माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे,जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रसाद खोबरे, पंचायत समिती सदस्य अंजना शिंदे, तारदाळचे सरपंच यशवंत वानी,खोतवाडी सरपंच संजय शिंदे,जयप्रकाश भागत,उमेश विभूते,प्रमोद पाटील,सुनिल विभूते,सचिन भोसले,सागर नाईक,मारुती खांडेकर, मार्केटिंग सुपरवायझर सत्यजित पाटील  व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!