मॅक्स लाईफच्या सर्वेक्षणात निवृत्तीनंतरच्या आयुष्याबद्दल सकारात्मक मानसिकता

 

नवी दिल्ली: मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. (“Max Life”/ “Company”), ने कंतार या जगातील आघाडीच्या मार्केटिंग डेटा आणि अॅनालिटिक्स कंपनीसोबत ‘इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडी’ (आयआरआयएस) या सर्वेक्षणाची दुसरी आवृत्ती सादर केली. या सर्वेक्षणात शहरी भारताची आरोग्यदायी, समाधानी आणि आर्थिकदृष्ट्या समाधानी निवृत्त आयुष्य जगण्याची कितपत तयारी आहे, या बाबींचा अभ्यास करण्यात आला. या स्वयं-प्रशासित डिजिटल अभ्यासात[1] ६ महानगरे, प्रथम श्रेणीतील १२ शहरे आणि द्वितीय श्रेणीतील १० शहरे अशा २८ शहरांचा समावेश होता.पश्चिम भारतातील रिटायरमेंट इंडेक्स ४६ इतका असल्याने (० ते १०० या प्रमाणात) हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर पूर्व विभाग ५१ आणि त्यानंतर दक्षिण ४३ वर आणि उत्तर विभाग ४१ वर आहे. पश्चिमेकडील भावनिक सज्जता ५८ वर आहे. निवृत्तीनंतर कुटुंब, मित्रमंडळी आणि सामाजिक पाठबळावरील अवलंबित्व वाढत असल्याचे यामुळे स्पष्ट होते. या विभागात आर्थिक आणि आरोग्य सज्जता अनुक्रमे ४८ आणि ४२ आहे.मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर (उप व्यवस्थापकीय संचालक) व्ही. विश्वानंद म्हणाले, “निवृत्तीसंदर्भातील अभ्यासाच्या आमच्या दुसऱ्या पर्वातून हे स्पष्ट झाले की बहुतांश भारतीयांना आपण निवृत्त होणार असल्याची कल्पना असली तरी ते त्यासाठी आर्थिक, भावनिक आणि आरोग्याच्या दृष्टीने पुरेसे सज्ज नाहीत. पश्चिम विभागात ६० टक्के प्रतिसादकर्त्यांनी सकारात्मक मत नोंदवले असले तरी, वाढत्या महागाईमुळे निवृत्तीनंतरच्या काळात आपली बचत संपून जाईल, अशी भीती ४१ टक्के प्रतिसादकर्त्यांमध्ये दिसून आली. भारतीयांना दीर्घकाळ आर्थिक संरक्षण मिळण्याची खातरजमा करण्यासाठी आयुष्यात लवकरात लवकर आर्थिक नियोजनाला सुरुवात करण्याचे महत्त्व पटवून देण्याची ही चांगली संधी आपल्याला मिळाली आहे.”

निवृत्तीसंदर्भातील दृष्टिकोन

या अभ्यासानुसार, पश्चिम भारतातील ६७ टक्के प्रतिसादकर्त्यांनी निवृत्तीसंदर्भात सकारात्मक विचार मांडले. जसे की, कुटुंबासोबत अधिक काळ घालवणे, चिंतामुक्त आयुष्य आणि अधिक स्वातंत्र्य. तर ३३ टक्के प्रतिसादकर्त्यांनी नकारात्मक भावना दर्शवल्या. आपण कदाचित फारसे फिट आणि आरोग्यदायी नसू, अशी भीती ६ टक्के प्रतिसादकर्त्यांना वाटते आणि ५ टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की कदाचित त्यांच्याकडे पुरेशी आर्थिक बचत नसेल.निवृत्तीसंदर्भात नियोजन करताना प्राधान्यक्रमात भावनिक पाठबळाला फारच दुर्लक्षित स्थान मिळाले आहे. फक्त ९ टक्के प्रतिसादकर्त्यांना वाटते की निवृत्तीच्या काळात भावनिक पाठबळ सर्वाधिक महत्त्वाचे असते, ६१ टक्के प्रतिसादकर्त्यांनी आरोग्य सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगितले तर २९ टक्के लोकांनी आर्थिक बाजूला महत्त्व दिले.निवृत्तीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.६२ टक्के प्रतिसादकर्त्यांनी याआधीच आपल्या निवृत्तीसाठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. वित्तीय उत्पादनांमध्ये गुंतवणुकीस चालना देणाऱ्या महत्त्वाच्या तीन कारणांमध्ये ‘मुलांसाठी आर्थिक स्थिरता’ (३६ टक्के), ‘गुंतवणुकीतून नजीकच्या काळात चांगला परतावा मिळतो’ (३६ टक्के) आणि ‘वैद्यकीय आपातकालीन काळात कुटुंबाची काळजी घेणे’ (३५ टक्के) यांचा समावेश आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!