
कोल्हापूर : नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात त्याच पद्धतीने थंडीच्या दिवसांमध्ये गरजू व समाजातील वंचित घटकांपर्यंत मायेची सावली म्हणून प्रत्येकाला आपल्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे जपण्याच्या उद्देशाने शहरातील विविध घटकांना स्वेटर वितरणाचे कार्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज भाजपा राजारामपुरी मंडळाच्या वतीने राष्ट्रीय दृष्टीहीन संघ संस्थेच्या अंध बंधू-भगिनींना स्वेटर प्रदान करण्यात आले.
भाजपा सरचिटणीस विजय जाधव यांनी या कार्यक्रमाप्रसंगी दादांच्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना सांगितले. दिलीप मैत्राणी, सविता भालकर, आजम जमादार यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यानंतर विजय जाधव भाजपा जिल्हा सरचिटणीस, दिलीप मेत्रानी, सविता भालकर, अभिजीत शिंदे आजम जमादार, रहीम सनदी, बापू राणे, महादेव बिरंजे यांच्या प्रमूख उपस्थितीत हे स्वेटर वाटप करण्यात आले. आजच्या या कार्यक्रमानंतर अंध बांधवानी समाधान व्यक्त करून चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले. यावेळी सागर आथने, शाहरुख गडवाले, मानसिंग पाटील, विश्वास जाधव, देवराज लोंढे, दत्ता लोखंडे , सयाजी पाटील, योगेश साळुंखे, ऋषभ ब्रह्मदंडे, उत्तम सावंत, ओंकार घाटगे, माणिक बाकळै, पदाधिकारी, कार्यकर्ते, दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply