
कोल्हापूर/प्रतिनिधी : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी २०२२ या सालातही पेट्रोल, पाॅवर पेट्रोल, डिझेल आणि ऑइल विक्रीमध्ये उच्चांकी विक्रीचे सातत्य ठेवल्याबद्दल हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड वेस्ट झोनचे चीफ जनरल मॅनेजर श्री. सीएच श्रीनिवास यांनी सदिच्छा भेट दिली.
पेट्रोल पंपावरील ग्राहकांची सेवा व कामकाज पाहून यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले. आणि कोरगावकर कुटुंबीयांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्याचे सेल्स ऑफिसर आदित्य अग्रवाल,HPCL चे रिजनल मॅनेजर प्रिन्स जिंदाल, पेट्रोल पंपाचे मालक अमोल कोरगावकर, आशिष कोरगावकर, राज कोरगावकर, अनिकेत कोरगावकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply