
कोल्हापूर : सन १९५६ मध्ये निपाणी ,बिदर, बेळगाव या शहरासह 865 खेड्यांचा समावेश कर्नाटक राज्यात करण्यात आला. सीमाभागात या निर्णयाला तीव्र विरोध झाला. भाषिक बहुसंख्य मुद्यावर सीमा ठरवण्यात आल्या होत्या मात्र बेळगाव सीमाप्रश्नात हा मुद्दा विचारातच घेण्यात आला नाही, असं आजही म्हटलं जातं. त्यातून सीमावादाचा लढा उभा राहिला. तेव्हापासून मराठी भाषिक जनतेचा सीमाप्रश्नाचा सुमारे ६६ वर्षांचा हा लढा सुरू आहे. महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न उच्चाधिकार समितीची पुनर्रचना शासन निर्णयाने करण्यात आली. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागामार्फत उपसचिव ज.जि.वळवी यांनी हा शासन आदेश पारित केला आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातून उच्च, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Leave a Reply