
कोल्हापूर : गोकुळच्या क्लस्टर बल्क मिल्क कुलर युनिटचे उद्घाटन माऊली दूध शितकरण केंद्र कदमवाडी, ता.कवठे महांकाळ, जि. सांगली येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच युवा नेते रोहित आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व इतर प्रमुख मान्यवराच्या उपस्थितीत झाले.यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते रोहीत आर.पाटील म्हणाले कि दुग्ध व्यवसायाला चालणा देण्याचे काम गोकुळने केले असून कवठे महांकाळ सारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी देण्याचे काम गोकुळ दूध संघ निश्चितच करेल असा विश्वास व्यक्त केला.भविष्यात उत्तम गुणवत्तेचे दूध संकलन करण्यासाठी गोकुळ दूध संघास सहकार्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि शेती बरोबर दुग्ध व्यवसाय हा टिकला तरच शेतकरी आर्थिक सधन होऊ शकतो. या साठी दुग्ध व्यवसायातील आधुनिकतेचा स्वीकार करत पारंपारिक दुग्ध व्यवसाय न करता तो आधुनिक पद्धतीने व किफायतशीरपणे करणे ही काळाची गरज आहे व पुढे बोलताना श्री.पाटील म्हणाले कि या परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. या भागात दूध संकलन वाढीसाठी गोकुळ च्या विविध योजनाचा लाभ शेतकऱ्यानी घ्यावा व दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे. या तालुक्यात वेगवेगळ्या भागात भविष्यात क्लस्टर बल्क मिल्क कुलरस युनिट सुरू करून उत्तम गुणवत्तेचे दूध संकलन करण्याचा गोकुळचा मानस आहे. असे मनोगत व्यक्त केले.
Leave a Reply