डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने २६ फेब्रुवारी २०२३ रोजी “नियाज प्राईड रन” होणार

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शरीराला फिट ठेवण्यासाठी धावणे,पोहणे,सायकलींग करणे अत्यंत महत्वाचे आहे.रोज नियमित व्यायाम करणारा वर्ग आजही आहे मात्र बदलत्या वातावरणाचा व ताणतणावामुळे लोकांवर व स्पर्धकांवर विपरीत परिणाम हा होत चालला आहे.यामुळे लोकांचा आता थंडीच्या दिवसात व्यायामकडे ओढा कमीच दिसून येत आहे.त्यामुळे सर्वांना एकत्र करण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन याहीवर्षी डेक्कन स्पोर्ट्स क्लब ने येत्या २६ फेब्रुवारी २०२३ रोजी *”नियाज प्राईड रन”* ही स्पर्धा केली आहे.अशी माहिती उदय पाटील, वैभव बेळगावकर,व ईर्षाद सौदागर,डॅा समीर नागटिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.आतापर्यंत डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने अनेक स्पर्धांच्या माध्यमातून देशविदेशातील व कोल्हापूर सह इतर जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. यात पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन, कराड येथे प्राईड रन हाफ मॅरेथॉन,बर्गमॅन ट्रायथलॉन अशा स्पर्धाचा समावेश आहे.आणि आता २३ फेब्रुवारी २०२३ ला ही नियाज प्राईड रन होत आहे.५ व १० किलोमीटर अंतराची ही स्पर्धा असून राजाराम तलाव येथे ही स्पर्धा होत आहे.एकूण ४००० स्पर्धकांचा सहभाग असणारी ही रन सर्वात मोठी असणार आहे.५ किलोमीटर स्पर्धा ही सकाळी ६:३० वाजता सुरू होणार आहे. ही स्पर्धा राजाराम तलाव येथे सुरू होणार आहे.ती शाहू टोल नाका येथून पुन्हा राजाराम तलाव येथे समाप्त होणार आहे.१० किलोमीटर ची स्पर्धा ही सकाळी ६ वाजता सुरू होणार असून ती राजाराम तलाव येथे सुरू होणार आहे.ती पुढे शाहू टोल नाका,बी.एस. एन. एल टॉवर व पुन्हा राजाराम तलाव अशी असणार आहे.५ किलोमीटर स्पर्धा ही १४ ते ३०, ३१ ते ४० व ४१ ते ५० आणि ५१ वर्षा पुढील सर्वांसाठी आहे.तर १० किलोमीटर ची स्पर्धा ही १६ ते ३०,३१ ते ४०,४१ ते ५०,व ५१ वर्षावरील सर्व अशा वयोगटात होणार आहे.जवळजवळ ४००० स्पर्धकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली असून यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना गुडी बॅग,टी. शर्ट, फीनीशर मेडल,टाईम चिप ई – सर्टिफिकेट नाश्ता हा दिला जाणार आहे.स्पर्धेसाठी नाव नोंदणी ही आता ३१ जानेवारी २०२३ पर्यंत करावयाची आहे.ही नोंदणी www.dscorg.in या वेबसाईटवर करावयाची असून अधिक महितीसाठी संपर्क हा डॅा. समीर नागटिळक ९९२३६१८०५४,आणि वैभव बेळगावकर – ८२०८१७२४०९ या मोबाईल क्रमांकाशी करायचा आहे.स्पर्धेसाठी डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे राजीव लिंग्रस,अभिषेक मोहिते,जयेश कदम,अश्कीन आजरेकर,अमर धामणे,अतुल पोवार,मनीष सूर्यवंशी,संजय चव्हाण,सबीर शहा,डिंम्पल त्रिवेदी, सोनाली पाटील,समीर चौगुले,अनुजा धर्मेश आदी पदाधिकारी संयोजन करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!