कोल्हापुरात १२ फेब्रुवारी रोजी होणार भव्य कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा

 

कोल्हापूर: क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबरच नवोदित खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने तसेच कोल्हापूरचे पर्यटन वाढीसाठी, डी. वाय. पाटील ग्रुपने केएससी रगेडियन कोल्हापूर रन ही अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा कोल्हापूर स्पोर्टस् क्लब (केएससी) व रगेडियन क्लब यांच्या वतीने रविवार दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित केली जाणार आहे.
सदर अल्ट्रा मॅरेथॉनचे यंदाचे हे 7 वे वर्ष असून देशभरातून या अल्ट्रा मॅरेथॉन साठी किमान 10 हजार पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होतील याची खात्री आहे. कोल्हापूर शहरात घेतली जाणारी ही भारतातील एकमेव अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा आहे, ‘कोल्हापूर रन’ ही केवळ मॅरेथॉन नसून आपल्या कोल्हापूर शहराचा कार्निव्हल आहे, ज्यामध्ये हजारो लोकांचा एक मोठा वर्ग एकत्र येऊन हा आनंदोत्सव साजरा केला जातो. या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेसाठी 10 लाखांपेक्षा जास्त रक्कमेची बक्षीसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे अंतर व मार्ग असा आहे
5, 10, 21, 42 आणि 50 किलोमीटर अश्या पाच गटात ही मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. तर वयोगट हे 18 वर्षाच्या आतील पुढे 18 ते 34, 35 ते 40, 41 ते 65 व पुढे 65 वर्षावरील सर्व महिला व पुरुष गट असणार आहेत. 5 किलोमीटर स्पर्धा पोलीस ग्राऊंड वरून सुरू होऊन ती कावळा नाका आणि पुन्हा पोलीस ग्राऊंड, 10 किलोमीटरची स्पर्धा ही पोलीस ग्राऊंड सुरू होऊन ती केएसबीपी चौक आणि पुन्हा पोलीस ग्राऊंड, 21 किलोमीटरची स्पर्धा ही पोलीस ग्राऊंड येथे सुरू होणार ती विमानतळ आणि पुन्हा पोलीस ग्राउंड, 42 किलोमीटरची स्पर्धा ही पोलीस ग्राऊंड येथे सुरू होणार ती विमानतळ ला दोन राउंड पूर्ण करावयाचे आहेत.तर 50 किलोमीटरची स्पर्धा ही पोलीस ग्राऊंड येथे सुरू होणार आहे ती अंबाबाई मंदिर पुन्हा पोलीस ग्राऊंड येथे येऊन पुन्हा विमानतळ दोन राउंड असे अंतर पार करावयाचे आहे.
स्पर्धेत नाव नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना, टी-शर्ट, मेडल, टाईम चिप, सर्टिफिकेट, बॅग, रेसचे फोटो आणि अल्पोपहार आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. शिवाय मॅरेथॉन दिवशी स्पर्धकांना झुंबा, नाशिक बेल, रॉक बँड, पोलीस बँड, मर्दानी खेळ, ढोल ताशा, पारंपरिक लेझीम, वाद्य आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे
आपली भावी पिढी सुदृढ व सक्षम व्हावी या उद्देशाने करवीरनगरीत राजर्षी शाहू महाराज यांनी तालीम परंपरा निर्माण करून ती विकसित केली. यापुढे जाऊन क्रीडानगरीचा भक्कम पाया रोवला. पारंपरिक खेळा प्रमाणेच नवनवीन खेळांना प्रोत्साहन व पाठबळ दिले. लोकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी आणि प्रत्येक कोल्हापूरकर फिट व्हावा, या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. नाव नोंदणी सुरू असून स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी ही वेळेत करावयाची आहे, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.
या स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी रग्गेडियन जिम, वायल्डर मेमोरियल चर्चच्या मागे, सासने ग्राउंड, न्यू शाहूपुरी, अजिंक्यतारा कार्यालय, ताराबाई पार्क, व ॲब्स् जिम, हॉटेल सयाजी, येथे करावयाची आहे तर अधिक माहितीसाठी www.kolhapurrun.com या संकेतस्थळावर भेट द्यावी, किंवा 7722067477 व 8310029257 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन स्पर्धा संयोजकांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला आ. सतेज पाटील, चेतन चव्हाण, आकाश कोरगावकर, डॉ.प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!