
कोल्हापूर: मुंबई,पुणे,कोल्हापूर,कोकण,गोवा व अन्य शहरांमधील चोखंदळ ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करून दृढ विश्वास निर्माण केलेले गोकुळने आणखीन एक नवीन उत्पादन घेऊन ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गोकुळ फ्लेवर मिल्क हे उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. त्याचा विक्री शुभारंभ आज दिनांक १५.१२.२०२२ रोजी माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफसो व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटीलसो यांच्या शुभहस्ते तसेच चेअरमनसो व संचालक मंडळाच्या यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.गेल्या काही काळांपासून ग्राहकांकडून सुगंधीत दुधाची (फ्लेवर मिल्क) वारंवार मागणी केली जात होती. ग्राहकांची सुगंधीत दुधाची (फ्लेवर मिल्क) मागणी लक्षात घेवून गोकुळच्या संचालक मंडळाने २०० मि.ली. पेटजार बॉटलमध्ये सुगंधीत दूध पॅकींग करून वितरीत करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. सदरचे सुगंधीत दूध हे गोकुळच्या उच्चत्तम दर्जाच्या व नैसर्गिक दुधापासून तयार केलेले आहे. सुगंधीत दूध डबल टोन्ड दुधापासून तयार केलेले असून त्यावर उच्च दर्जाची प्रकिया केलेमूळे ते दूध नॉर्मल तापमांनाला १८० दिवस टिकणारे आहे. त्यामूळे गायीच्या दूधाचा वापरही वाढणार आहे, सुगंधीत दूध तयार करतांना वापरलेले कलर व फ्लेवर हे उच्च दर्जाचे व फुडग्रेड क्वॉलीटीचे असल्याने ते ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी ) यांनी व्यक्त केला. सध्या सुगंधीत दूध हे स्ट्रॉबेरी, पिस्ता, व्हेनीला व चॉकलेट या चार प्रकारांमध्ये ग्राहकांना उपलब्ध केलेले असून सदरचे फ्लेवर मिल्क २०० मि.ली. पेटजार बॉटलमध्ये असणार आहे. त्याची ग्राहकांसाठी किमत ३० रुपये राहणार आहे. तरी सदर सुगंधीत दुधाचा फ्लेवर मिल्कचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.याचबरोबर पुढील काळात ताक व लस्सी टेट्रापॅकमध्ये पॅकिंग करून ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा मानस गोकुळचे चेअरमन श्री. पाटील यांनी व्यक्त केला.स्वागत व प्रास्ताविक संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले तर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी सविस्तर माहिती दिली तसेच आभार संचालक शशीकांत पाटील चुयेकर यांनी मानले व सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले.यावेळी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटीलसो व माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफसो, चेअरमन विश्वास पाटील, जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर,किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, विजयसिंह मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रटरी प्रदीप पाटील, मार्केटींग व्यवस्थापक हनमंत पाटील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.
Leave a Reply