नीट आणि जेईईचे परिपूर्ण प्रशिक्षण देणाऱ्या आयआयबी संस्थेची कोल्हापुरात शाखा सुरू

 

कोल्हापूर /प्रतिनिधी : बारावीनंतर मेडिकल आणि इंजीनियरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी हजारो विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेला म्हणजे नीट आणि जेईई या परीक्षेला बसतात. मात्र त्यासाठी परिपूर्ण प्रशिक्षण देणारी संस्था नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. ही विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्यासाठी आयआयबी अकॅडमीने कोल्हापुरात आपली शाखा सुरू केली आहे. मेडिकल आणि इंजीनियरिंगची प्रवेश परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामुळे सर्वोत्कृष्ट अकॅडमीतर्फे कोल्हापुरात प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती आयआयबीचे संचालक चिराग सेनमा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल्हापूर केंद्रावर 1 फेब्रुवारीपासून नियमित क्लासेस सुरू होणार आहेत. तसेच 22 जानेवारी रोजी स्कॉलरशिप परीक्षा आहे. असेही त्यांनी सांगितले. नांदेडमध्ये 23 वर्षांपूर्वी प्राध्यापक गणेश चौगुले यांनी आयआयबीची पहिली शाखा सुरू केली. त्यानंतर लातूर, पुणे आणि आता 25 डिसेंबर रोजी कोल्हापुरात शाहूपुरी तिसरी गल्ली येथे राधाकृष्ण मंदिरासमोर आयआयबीची शाखा सुरू करण्यात आली आहे. या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता स्तर वाढला आहे. तसेच या दोन्ही मुख्य आणि ॲडव्हान्स परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून अचूक मार्गदर्शन केल्यामुळे आयआयटीसह अनेक चांगल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. या संस्थेमध्ये प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र आणि तज्ञ शिक्षक तसेच प्रत्येक उपविषयांसाठी स्वतंत्र शिक्षक वर्ग उपलब्ध आहेत. तसेच दर रविवारी नीट व जेईईचे पॅटर्नवर आधारित परीक्षा घेतली जाते. तसेच महिन्याच्या शेवटी पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाते. त्यानंतर विषयवार मूल्यांकन, सत्रवार मूल्यांकन आणि परीक्षा होण्यापूर्वी अंतिम मूल्यांकन केले जाते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देणे आणि हुशार विद्यार्थ्यांची वेगळी बॅच करून त्यांची गुणवत्ता वाढवण्याकरता विशेष प्रयत्न केले जातात.लातूर पॅटर्ननंतर आता कोल्हापूर पॅटर्न तयार करून आयआयबी अकॅडमी पूर्ण राज्यात कोल्हापूरचा नीट आणि इंजीनियरिंग मध्ये नावलौकिक करेल असा विश्वास संचालक चिराग सेनमा यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक उत्तरेश्वर खराटे, सतीश राघव यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!