
कोल्हापूर/ प्रतिनिधी : दूध उत्पादक संघ गोकुळ च्या वतीने म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमा अंतर्गत करवीर तालुक्यातील संघाचे अधिकारी, कर्मचारी यांची मिटिंग संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संचालकसो यांच्या उपस्थित घेण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि संघाच्या वतीने वीस लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला असून हे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी संघ विविध योजनाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. यामध्ये संघाचा महत्वाचा घटक असणारे संघाचे कर्मचारी यांचाही सहभाग या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण आहे. सर्व कर्मचार्यांनी संघाच्या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमात सहभाग नोंदवून या कार्यक्रमा अंतर्गत के.डी.सी.सी.बँक व अण्णासाहेब पाटील महामंडळ व गोकुळ कर्मचारी पतसंस्थेकडून जातिवंत म्हैस खरेदी कर्ज योजने अंतर्गत सर्व संघ कर्मचार्यांनी जनावरे खरेदी करून दूध वाढ कृती कार्यक्रमामध्ये आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी असे आवाहन केले. पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले कि या कार्यक्रमाअंतर्गत कर्मचारी वर्गासाठी दूध वाढीचा कृती आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी काही तालुक्यातून चालू आहे. भविष्यात ती पूर्ण कार्यक्षमतेने राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.तसेच यावेळी उपस्थित असलेले संघाचे अधिकारी व कर्मचारी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी स्वागत व प्रास्ताविक संचालक शशिकांत पाटील – चुयेकर यांनी केले व माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, बाळासो खाडे,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, गोकुळ कर्मचारी संघटनेचे सदाशिव निकम यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच आभार संचालक प्रकाश पाटील यांनी मानले.सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले.यावेळी चेअरमन विश्वास पाटील,माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे , संचालक बाबासाहेब चौगले,शशीकांत पाटील-चुयेकर,संभाजी पाटील,प्रकाश पाटील,बाळासो खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डेअरी मॅनेजर अनिल चौधरी,आस्थापना व्यवस्थापक डी.के.पाटील,संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुरंबेकर, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले,संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply