
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कुस्ती क्षेत्रातील अनमोल योगदानामुळे संपूर्ण देशात कुस्ती पंढरी म्हणून सन्मान असणाऱ्या कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्यावतीने प्रदीर्घ अशा कालखंडानंतर राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात देश पातळीवरील नामांकित मल्लांचे बेमुदत निकाली कुस्त्यांचे शनिवारी दिनांक ७जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता जंगी मल्लयुद्ध आयोजित करण्यात आले असून या मैदानात एक ते पाच नंबरच्या मोठ्या कुस्त्यांबरोबर १०७ चटकदार कुस्त्या लावण्यात येणार असून तमाम कुस्ती शौकिनांना या कुस्ती मैदानाच्या निमित्ताने वाघा सिंहाच्या लढती पहावयास मिळणार आहेत. या मैदानामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, पालकमंत्री दीपक केसरकर तसेच माजी मंत्री आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत चांदीची गदा देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष व्ही.बी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी युवराज मालोजीराजे छत्रपती, खास.युवराज संभाजीराजे छत्रपती महादेवराव आडगुळे उपस्थित होते.
Leave a Reply