२६ जानेवारीला लागणार ‘बांबू’

 

प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू नयेत आणि तुमचे गेलेले प्रेम यू टर्न मारून परत येण्यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे. प्रेमात बांबू कसे लागतात, याची गोष्ट सांगणारा ‘बांबू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेरनिर्मित, विशाल देवरूखकर दिग्दर्शित, अंबर विनोद हडपलिखित या चित्रपटात अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, पार्थ भालेराव, वैष्णवी कल्याणकर, समीर चौघुले, स्नेहल शिदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटातील ‘मी तुला त्या नजरेनं’ हे धमाल गाणेही नुकतेच प्रदर्शित झाले असून तरुणाईला भुरळ घालणारे हे गाणे रोहित राऊत आणि ज्ञानदा पवारने गायले आहे. या गाण्याचे बोल सचिन पाठक यांचे असून समीर सप्तीसकर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरूखकर म्हणतात,

‘’ मुळात तरुणाईला हा चित्रपट त्यांच्या आयुष्याच्या जवळपासचा वाटणारा आहे. यूथला समोर ठेवून जरी या चित्रपटाची निर्मिती केली असली तरी तरुणांनी हा चित्रपट त्यांच्या पालकांसोबत पाहावा, असा आहे. २६ जानेवारीला ‘बांबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा एक धमाल एंटरटेनर आहे.’’निर्माती तेदस्विनी पंडित म्हणते, ‘’या टीमसोबत काम करताना खूप धमाल आली. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत. प्रत्येकानेच आपली भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटाची मांडणी अतिशय उत्तम आहे. मला खात्री आहे, प्रेक्षकांना ‘बांबू’ नक्कीच आवडेल.’’निर्माते संतोष खेर म्हणतात, ‘’ मुळात याची कथा आम्हाला विशेष भावली. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी बांबू लागतातच. मग ते प्रेमात असो वा इतर कशाही बाबतीत. अशीच प्रेमात ‘बांबू’ लागल्याची गोष्ट आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार असून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा हा ‘बांबू’ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!