
कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘सिद्धगिरी मठावर पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेनुसार अनेक लोकोपयोगी प्रकल्प राबवण्यात येतात.रोटरी क्लब-सनराईज यात योगदान देण्यासाठी सदैव आघाडीवर असेल.’ असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज, चंद्रकांत राठोड व सिद्धगिरी मठ यांच्या संयुक्त विद्यमानाने सिद्धगिरी मठ, कणेरी येथे राज्यातील पहिली श्वान शाळा ‘सिद्धगिरी शुनक सेवा धाम’ व सिद्धगिरी हॉस्पिटल येथे मॅमोग्राफी आणि न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीम लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले. शवन प्रकल्प उभारणीत रोटरी सनराईज, चंद्रकांत हंजारीमलजी राठोड परिवार व सामूहिक प्रयत्नातून उभा केला आहे. महाराष्ट्रातील पहिली अशी भटक्या कुत्र्यांसाठी श्वान शाळा आहे.यात एकूण ४०० भटक्या कुत्र्यांना आश्रय दिला जाणार आहे. व त्यांचे पालन पोषण केले जाणार आहे. तसेच या ठिकाणी सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर साठी अद्ययावत असे मेंदूवरील जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी गरजेचे असलेले ६५ लाख रुपये किंमतीचे “न्यूरो मॉनिटरिंग मशीन” द रोटरी फाउंडेशन व मदाग्रास्कर रोटरी क्लब व रोटरी सनराइज कोल्हापूर यांच्या आर्थिक सहकार्यातून देण्यात आले.शिवाय कॅन्सर तपासणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे “मॅमोग्राफी युनिट”प्रदान केले गेले. त्याचे उदघाटन आज अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामीजी व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामीजी यांनी माणसातील संवेदनशीलता संपत चालली असून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कणेरी मठ येथे भटक्या गरजू श्वानासाठी शवन प्रकल्प उभा करण्यात आला आहे.माणसाला जशी वृद्धाश्रमाची आवश्यकता असते.तशीच आता श्वानानाही आहे. रोटरी क्लब करत असलेल्या समाज उपयोगी कामांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना रोटरी सनराइजचे माजी अध्यक्ष सचिन मालू यांनी रोटरी सनराईच्या वतीने कणेरी मठ येथे आमच्या हातून जो उपक्रम राबविला गेला आहे तो एक खारीचा वाटा आहे मात्र यापुढेही रोटरी सनराईज कणेरी मठासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली.
या उद्घाटन सोहळ्यासाठी रोटरी सनराईजतर्फे माजी अध्यक्ष सचिन मालू व सचिव दिव्यराज वसा यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व सदस्य विक्रांत सिंह कदम, प्रसन्न देशिंगकर, राहुल.आर. कुलकर्णी, सचिन झंवर,राजूभाई परीख,चंद्रकांत राठोड, इंद्रजीत दळवी, डॉ. सचिन पाटील यांचे सहकार्य लाभले.यावेळी माजी प्रांतपाल गौरीश धोंड, विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे व भावी प्रांतपाल नासिर बोरसदवाला, शरद पै, अरुण भंडारे व माजी सहाय्यक प्रांतपाल करुणाकर नायक व विद्यमान सहाय्यक प्रांतपाल सुभाष कुत्ते, डिस्ट्रिक्ट ऑफिसर अजय मेनन आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे आभार सिद्धगिरी हॉस्पिटलचे धनंजय जाधव यांनी मानले.
Leave a Reply