दक्षिण मतदारसंघातील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळा

 
कोल्हापूर: दक्षिण मतदारसंघातील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळा आज  आमदार डॉ. विश्र्वजीत कदम यांच्या हस्ते कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे झाला.
गावाच्या विकासासाठी सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. गावाच्या विकासासाठी आराखडा बनवून कामास सुरुवात करावी.दक्षिण मध्ये  ग्रामपंचायत निवडणुकीत भरीव यश मिळाले. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकजुटीने लागा, आपल्या गटाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी काम करावे. आ. ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून होत असलेल्या  विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन केले.
आमदार विश्र्वजीत कदम यांनी सांगितले की, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील १३ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी ३४४ कोटी मंजूर करून आणले आहेत हि निश्चितच कौतुकाची बाब आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आमदार ऋतुराज पाटील यांच्यासारख्या युवा आमदाराने ठसा उमटविला आहे. ग्रामपंचायत हा विकासाचा महत्वाचा पाया आहे. सध्या थेट निधी येत असल्याने ग्रामपंचायतींना अधिकार मिळाले आहेत. सरपंचांनी सर्व सदस्यांना विश्र्वासात घेऊन काम करावे.
विकासाची नवी दृष्टी असणारी तरुण पिढी सुद्धा ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये सक्रिय होत आहे, हे निश्चितपणे एक आशादायी चित्र आहे. या युवा पिढीला सोबत घेऊन गावच्या विकासासाठी नव्या संकल्पना राबविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका निश्चितपणे राहील असे मत यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कणकवली तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर व सहकाऱ्यांनी तयार केलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन झाले.प्रास्ताविक जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी केले. लोकनियुक्त सरपंच उत्तम आंबवडे (उजळाईवाडी), मधुकर चव्हाण (उंचगाव ), सौ  शुभांगी आडसुळ (सरनोबतवाडी), सौ. ज्योती कांबळे (निगवे खालसा) यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस ऍड. गुलाबराव घोरपडे, प्रदेश सचिव शशांक बावचकर, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख,  काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष सचिन चव्हाण, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुयेकर , प्रकाश पाटील, बयाजी शेळके, जिल्हा बँक संचालक स्मिता गवळी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष उदय पोवार, बिद्री कारखान्याचे संचालक श्रीपती पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, करवीर पंचायत समिती माजी सभापती मंगल पाटील, विश्र्वास दिंडोर्ले, विलास साठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!