
कोल्हापूर/प्रतिनिधी :भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन औचित्य साधून देशातील अग्रगण्य बेड लिनन उत्पादक इंडो काउंटने आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना प्राण गमावलेल्या शहीद जवानांच्या मुलांना ‘करेंगे पूरे, सपने अधूरे’ या उपक्रमांतर्गत कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम आज पार पडला.
इंडो काउंटच्या बुटीक लिव्हिंग ब्रँडने, वीर सेनानी फाउंडेशनच्या सहकार्याने २५ हुशार मुलांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली. कोल्हापूर, अहमदनगर आणि नाशिक, गडहिंग्लज, शिवदान आणि इतर अनेक भागांतून मुले आली होती.
यावेळी एनएनसी-कोल्हापूरचे ग्रुप कमांडर कर्नल विक्रम नलावडे, वीर सेनानी फाउंडेशनचे कर्नल विक्रम पत्की, इंडो काउंटचे कार्यकारी संचालक आणि सीईओ
श्री के.के.लालपुरिया, इंडो काउंटचे संचालक कमल मित्र यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी राहुल रेखावार होते.
कार्यक्रम आणि उपक्रमाबद्दल बोलताना, इंडो काउंटचे सीईओ आणि कार्यकारी संचालक के.के.लालपुरिया म्हणाले, ‘करेंगे पूरे, सपने अधूरे’ हा उपक्रम म्हणजे शहीद लष्करी जवानांचे एकही मूल त्यांच्या स्वप्नांच्या आणि आकांक्षांच्या बाबतीत मागे राहू नये यासाठी आमचा मनापासून प्रयत्न आहे.”
आम्हा सर्वांना शैक्षणिक येथे उपस्थित असलेले प्रत्येक मूल त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करेल आणि एक दिवस देशासाठी उत्कृष्ट काम करेल.”
‘करेंगे पूरे, सपने अधुरे’ उपक्रमात
कार्तिक आर्यन, अनिल कपूर, शिखर धवन आणि इतर सेलिब्रिटींनीही बुटीक लिव्हिंगच्या सीएसआर अॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला होता.
Leave a Reply