दूध व्यवसाय टिकवणे आणि त्यात स्थैयर्ता आणण्याची गरज :आमदार सतेज पाटील

 

कोल्हापूर/प्रतिनिधी: दूध व्यावसायिकांना पशुसंवर्धनाचे ज्ञान आणि डेअरीच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या इंडियन डेअरी फेस्टिवल २०२३चे उद्घाटन केले. याप्रसंगी चितळे डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्र्वास चितळे, पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष श्रीमती कांचनताई पवार, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष हिंदुराव जाधव, गोकुळचे माजी संचालक अरुण नरके साहेब, परिषदेचे आयोजक चेतन नरके उपस्थित होते.

परिषदेच्या पहिल्या सत्रात अनुप कुमार (अप्पर मुख्य सचिव, सहकार आणि पणन, महाराष्ट्र शासन), राजीव मित्रा (सीईओ, प्रभात डेअरी), निरंजन कराडे (टीम लीडर, इनोव्हेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट सेल, NDDB), योगेश गोडबोले (व्यवस्थापकीय संचालक, गोकुळ दूध संघ) यांनी दुग्ध व्यवसायातील बदलती परिस्थिती या विषयावर मार्गदर्शन केले.

१९७० साली भारतात Operation Flood सुरु झाले. त्यामुळे दूध व्यवसायात क्रांती झाली. सध्या दूध व्यवसाय टिकवणे आणि त्यात स्थैयर्ता आणण्याची गरज आहे. NDDBने यात लक्ष घालून दूध व्यावसायिकांना सर्वतोपरी सहकार्य करावे अशी विनंती आमदार सतेज पाटील यांनी या परिषदेच्या माध्यमातून केली.

दूध उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे.भविष्यात दूध व्यवसायात व्यावसायिक स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. यासाठी दूध व्यवसायाचं ब्रॅण्डिंग, नव्या संकल्पना, नवीन तंत्रज्ञानाचा, माहितीचा वापर करण्यासाठी NDDB ने मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. दूध व्यवसायाच्या वाढीसाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. जनावरांची योग्य गणना आपल्याकडे असणे आवश्यक आहे. ज्यामुळे जनावरांची संख्या व एकूण दूध उत्पादन यांचा ताळमेळ घालता येईल असे मत यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी मांडले.
दूध व्यवसायात तरुण पिढीला समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे. विविध प्रशिक्षणाच्या मार्गाने त्यांचा समावेश झाल्यास दूध व्यवसाय नक्की भरभराटीस येईल. तसेच दुधाची घट जागतिक तापमान वाढीमुळे होत आहे. यासाठी योग्य ते उपाय करून दूध पुरवठा कसा वाढवता येईल याकडे लक्ष देण्यासाठी या डेअरी फेस्टिवलमध्ये विविध विषयांवर चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती डेअरी फेस्टिवलचे निमंत्रक व गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी दिली.
या कार्यक्रमास गोकुळचे संचालक सुजित मिणचेकर, बाबासो चौगले, नंदकुमार ढेंगे, प्रा. किसन चौगले, यळगूडचे लोकनियुक्त सरपंच सुजित मोहिते यांच्यासह मान्यवर, दूध उत्पादक व्यावसायिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!