भीमा कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची गर्दीचा महापूर

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे *भीमा कृषी प्रदर्शन २०२३* प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी अलोट गर्दी ही मेरी वेदर मैदानावर केली होती.प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून तीन वेळा नॅशनल चॅम्पियन मिळविणारा जगातील सर्वात मोठा हरियाणातील १२ कोटीचा बादशहा नावाचा रेडा आणि ३१ लिटर दूध देणारी बिजली नावाची म्हैस प्रदर्शनाची खास आकर्षण ठरत आहे.

याचबरोबर गाय आणि बैल या दोन्हीचा संगम असणारी खिलार जातीचा बैजा नावाचा पाच वर्षाचा पांढरा बैल व हरियाणा जातीची रेडी जी ३३ महिन्याची आहे मुऱ्हा जातीची १९ लिटर दूध देणारी म्हैस रावण नावाचा लाल कंधारी वळू जो नांदेड जिल्ह्यातील सुनेगाव येथील आहे ज्याने महाराष्ट्र चॅम्पियन दोन वेळा पटकावला आहे. तर अन्य स्पर्धांमध्ये त्यांने प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आहे. सर्जा नावाचा कपिला गीर आठ वर्षे सहा महिन्याचा दोन दाती बैल आहे जो कोपर्डी तालुका आजरा येथील आहे.८ लाख ५१ हजार किंमत असलेली १८.१ लिटर दूध देणारी पाच वर्षे वयाची मुऱ्हा जातीची म्हैस, इतर खोंड, जाफराबादी गायी,हँगस्टर जातीचे उंदीर, व ७० व ५० किलो वजनाचा उस्मानाबादी बकरा, कडकनाथ कोंबड्या लव बर्ड आफ्रिकन फिशर, पपेट,पांढरे उंदीर ससे बेकिंग बदक,घोडे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.याचबरोबर भीमा फार्म अँग्रोमधील पक्षी तर देशी आयुर्वेदिक शिवकालीन काळा ऊस,खुपिरे येथील झाडाला पिकलेली देशी सेंद्रिय केळी आकर्षण ठरत आहे.
शिवाय ऊस पिकावर ड्रोन द्वारे फवारणी हेही आकर्षण ठरत आहे.प्रदर्शनात दोन दिवसात झाली ५ कोटीच्या आसपास उलाढाल ही झाली आहे.
यावर्षीचे प्रदर्शनाचे १४ वर्ष असून चारशे हून अधिक देश विदेशातील विविध कंपन्यांचे स्टॉल, २०० पेक्षा अधिक महिला बचत गटाचा सहभाग, एकूण २०० जनावरे अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, शेततळे,आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मेरी वेदर मैदानावर मोठी गर्दी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!