डेक्कन स्पोर्ट्स क्लबतर्फे लहान मुलांच्या धावणे स्पर्धा संपन्न

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी : डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने बर्गमॅन ११३ या स्पर्धेचे आयोजन येथील राजाराम तलाव परिसरात आज २८ व उद्या २९ जानेवारी २०२३ या दोन दिवशी केले आहे. लहान मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी प्रथमच डेक्कन स्पोर्ट्स क्लबने प्रथमच लहान मुलांसाठी बर्ग किड्स स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये लहान मुलाच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना मेडल व टाईम चिप देण्यात आली होती. आज लहान मुलांच्या स्पर्धा संपन्न झाल्या.बर्गमॅन ही स्पर्धा कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलंम लोकोसत्व यास अर्पण करण्यात आली आहे.आज झालेल्या स्पर्धा अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून सुरुवात करण्यात आली.यावेळी बोलताना अदृश्य कार्ड सिद्धेश्वर स्वामीजी यांनी लहान मुलांसाठी डेक्कन स्पोर्ट्स क्लबने स्पर्धा आयोजित करून मुलांमधील कलागुणांना वाव दिला आहे.आरोग्य सुदृढ असेल तर सर्वकाही करता येऊ शकते यासाठी ही लहान पिढी आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ असणे आवश्यक असंल्याचे सांगितले.आज २८ रोजी लहान मुलांसाठी बर्ग किड्स या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात ५ ते ११ वयोगटातील लहान मुलांचा समावेश होता.या स्पर्धेत ३,२,१ व ५०० मीटर धावणे अशा वयोगटात स्पर्धा झाल्या. ३ किलोमीटर १२ ते १४ वयोगटमध्ये महिला गटात वेदिका जाधव प्रथम क्रमांक, आयुषी पाटील द्वितीय क्रमांक, सारा जाधव तृतीय क्रमांक, २ किलोमीटर १० ते १२ वयोगटमध्ये पुरुष गटात दक्ष यादव प्रथम क्रमांक,कृष्णा सूर्यवंशी द्वितीय क्रमांक, यशराज पाटील तृतीय क्रमांक, महिलांमध्ये अनुष्का मिठारी प्रथम क्रमांक, साक्षी कुलकर्णी द्वितीय क्रमांक,मधुरीमा तोडकर तृतीय क्रमांक, १ किलोमीटर ७ ते १० पुरुष वयोगटात विहान काशेकर प्रथम क्रमांक,शार्दुल कुंभार द्वितीय क्रमांक, ज्योतिरादित्य शिंदे तृतीय क्रमांक, महिलांमध्ये योगेश्वरी पाटील प्रथम क्रमांक, स्वरा पाटील द्वितीय क्रमांक, ईशान्वी तृतीय क्रमांक, ५०० मीटर ७ वर्षाखालील पुरुष गटात दक्ष पाटील प्रथम क्रमांक, राजवील भोसले द्वितीय क्रमांक,अत्तरेय पुजारी तृतीय क्रमांक, महिलांमध्ये ओवी कदम प्रथम क्रमांक, झिल बेलापुरे द्वितीय क्रमांक, शानवी शिंदे तृतीय क्रमांक पटकावले आहेत. स्पर्धेसाठी पोलीस प्रशासन पाटबंधारे खाते शिवाजी विद्यापीठ यांचे सहकार्य लाभले आहे.या स्पर्धेचे आयोजन जयेश कदम,राजीव लिंग्रज,उदय पाटील,वैभव बेळगावकर, संजय चव्हाण,अमर धामणे,अभिषेक मोहिते,अतुल पोवार,डॉ. समीर नागटिळक,समीर चौगुले यांनी केले होते.यावेळी डी. वाय. एस.पी मंगेश चव्हाण,डॉ. संदीप पाटील,बापू कोंडेकर,प्रकाश मेहता, राजीव लिंग्रज,उदय पाटील,वैभव बेळगावकर, संजय चव्हाण,अमर धामणे,अभिषेक मोहिते,अतुल पोवार,डॉ. समीर नागटिळक उपस्थित होते.स्पर्धेत ३०० लहान स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!