
कोल्हापूर/प्रतिनिधी: ज्याप्रमाणे विशाळगडाची अवस्था झाली आहे त्याप्रमाणे पावनगडाची अवस्था होऊ नये म्हणून या वर्षीपासून विश्व हिंदू परिषद बजरंग दल पावनगड, तालुका पन्हाळा येथे महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री साजरी करणार असून येत्या १७ तारखेला रात्री नऊ ते बारा भजन व जागर आणि आणि दिनांक १८ रोजी सकाळी सहा वाजता अभिषेक, सकाळी नऊ ते दहा दुर्ग सेवक व गोरक्षक यांचा सत्कार समारंभ होणार असून सकाळी दहा ते अकरा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांची अकरावी वंशज ह भ प श्री श्री मोरे महाराज (देहू आळंदी) यांचे व्याख्यान होणार आहे. सकाळी ११.३० वाजता महाआरती होऊन सर्वांना महाप्रसाद वाटप होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने पावनगडाची पावित्र्य टिकवण्यासाठी या महाशिवरात्रीला दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींनी पावनगडावर यावे असे निवेदन या पत्रकार परिषदेमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे जिल्हा मंत्री ॲड. सुधीर जोशी वंदुरकर, अध्यक्ष श्री कुंदन पाटील आणि बजरंग दल शहर संयोजक श्री पराग फडणीस, सहसंयोजक श्री अक्षय ओतारी यांनी दिले. यावेळी विश्व हिंदू परिषदचे उपाध्यक्ष शांतीबाई लिंबांनी, शहर मंत्री उत्तम सांडुगडे, राजेंद्र मकोटे, तुषार भिवटे, दुर्गा वाहिनी संयोजिका एडवोकेट सुप्रिया दळवी तसेच अश्विनी माळकर उपस्थित होते.
Leave a Reply