महाटेक २०२३ औद्योगिक प्रदर्शन ९ फेब्रुवारीपासून

 

कोल्हापूर /प्रतिनिधी – १९ व्या महाटेक २०२३ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालय पटांगनावर दि.९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हे महाटेक औद्योगिक प्रदर्शन प्रदर्शन होणार आहे. दरम्यान, या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की महाटेकचे हे १९ वे वर्ष असून या प्रदर्शनात भारत व भारताबाहेरील २७५ पेक्षा जास्त उद्योजक सहभागी होणार असून जवळपास २५००० हून अधिक ग्राहक भेट देणार आहेत.या प्रदर्शनात प्रवेश विनामूल्य असून, ऑनलाईन नोंदणी सेवा उपलब्ध आहे. महाटेक २०२३ च्या भव्य औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे उद्योग उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!