
कोल्हापूर: शाहूपुरीमध्ये जन्मलेल्या रविंद्र शिंदे यांनी महापालीकेच्या शाळेत शिक्षण घेतले. उदरनिर्वाहासाठी रविंद्र यांनी वर्तमानपत्र टाकली, टू व्हीलर मॅकेनिक, आणि नंतर ट्रान्स्पोर्ट कंपनीत काम करत रविंद्र शिंदे यांनी संगीत साधना केली. राजर्षि शाहू संगीत विद्यालयात संगीताचे शिक्षण घेतल्यावर शिंदे यांनी मुंबई गाठली. त्याकाळी स्टार प्लसवर आयोजित गाण्याच्या स्पर्धत प्रथम क्रंमाक मिळवत शिंदे यांनी गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला होता. त्यानंतर बॉलीवूडमध्ये हिंदी गाण्याबरोबरच मराठी, नेपाळी, बंगाली, भाषेत आणि टिवी मालीकांसाठी गीत गायन केले.आघाडीच्या संगीतकारा पैकी राजेश रोशन, कल्याणजी आनंदजी, विजू शहा तर गायक कैलाश खेर, आशा भोसले, नितीन मुकेश, साधना सरगम, शब्बीरकुमार, शैलेंद्रसिंग ,सुदेश भोसले, अन्नूकपूर, उस्ताद झाकीर हूसेन यांच्या सोबत अनेक मैफली देश विदेशात गाजवल्या आहेत.विशेषतः किशोरदांचे जन्मगाव असलेल्या मध्यप्रदेशातील खांडवा गावात दोनवेळा सरकारने त्यांचा सन्मान केलाय. बॉलीवूडमधील बहुंताश कलाकारांसमोर शिंदे यांच्या मैफली झाल्या आहेत.
एवढे उत्तुंग यश मिळवल्यानंतरही रविंद्र शिंदे यांचे कोल्हापूर वासिय मित्रांशी घनिष्ट संबंध टिकून आहेत’.वेळ मिळेल तेव्हा ते आवर्जून कोल्हापूरला येऊन मित्रांमध्ये रमतात. देश विदेशात अनेक मैफली गाजवून प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेल्या रविंद्र शिंदे यांचा कोल्हापूर वासियांच्या वतीने नागरी सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी अकरा फेब्रूवारीला सायं. चार वाजता केशवराव भोसले नाटयगृहात हा सत्कार सोहळा होणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या हस्ते शिंदे दाम्पत्याचा सत्कार होणार आहे. तसेच या निमीत्त रविंद्र शिंदे आणि मुंबईचे सहकलाकार गायक आणि वादक सहभागी होणार आहेत. हा कौतुक सोहळा करवीरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडणार आहे अशी माहीती विजयकुमार अकोळकर यांनी दिली. पत्रकार परिषदेला.. युवराज माळी , आनंद शिंदे, रमेश वडणगेकर दिगंबर जाधव,उपस्थित होते..
Leave a Reply