
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरगावकर पेट्रोल पंपावर डिझेल १ रु व पेट्रोल २ रु. स्वस्त दराने २६ जानेवारी रोजी दिवसभर हा उपक्रम राबविण्यात आला. हा स्वस्त दराच्या उपलब्धतेचा बोर्ड कोरगावकर पेट्रोल पंपावर २६ जानेवारीपूर्वी एक आठवडा अगोदर लावण्यात आला होता. यामुळे दिवसभर ग्राहकांची पेट्रोल व डिझेल खरेदीसाठी झुंबड उडाली होती. कोरगावकर पेट्रोल पंपाचे नाव भारतामध्ये उच्चांकी इंधन विक्री करणाऱ्या पेट्रोल पंपापैकी एक आहे. पंपाचे मालक हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै. अनंतराव गोविंदराव कोरगावकर यांनी या पंपाची स्थापना ६५ वर्षांपूर्वी केली होती. त्यांना इंदिरा गांधी नॅशनल अँवॉर्ड २००० साली देऊन गौरविण्यात आले होते. त्याचवेळी मदर टेरेसा हा सुद्धा अँवॉर्ड देऊन प्रजासत्ताक दिनी गौरवण्यात आले होते. याचे औचित्य साधून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इंधन कमी दराने म्हणजे डिझेल १ रु व पेट्रोल २.रु कमी दराने विक्री करून ही आदरांजली वाहिली आहे.हा कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी सुद्धा आयोजित केला जातो. पंपावर दिवसभर येणाऱ्या ग्राहकांना जिलेबीचे वाटप यानिमित्ताने करण्यात येते.
कै. अनंतराव कोरगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक कार्यास मान देऊन पंपावर संपूर्ण कोरगावकर कुटुंबीयांनी आपल्या स्टाफसमवेत राष्ट्रगीत गाऊन मोठ्या उत्साहात झेंडा वंदन केले. दिवसभर पंपावर देश गीते लावण्यात आली होती.
याचबरोबर पंपावर दररोज सकाळी ९ वाजता राष्ट्रगीत गाऊन दिवसाची सुरुवात केली जाते .हा राष्ट्राभिमानाचा उपक्रम याठिकाणी निरंतर चालू आहे.शिवाय कै. अनंतराव गोविंदराव कोरगावकर यांच्या विचाराची आठवण राहावी यासाठी सर्व स्टाफला मोफत नाश्ता व दुपारी १ वाजता येणाऱ्या लोकांना मोफत भोजन दिले जाते.
Leave a Reply