
कोल्हापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर विविध आरोग्य विषयक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम राबविले जाणार असून, मा.मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होण्याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने उद्या श्री अंबाबाई मंदिर येथे युवासेनेमार्फत, कसबा बावडा ग्रामदैवत श्री. हनुमान मंदिर येथे शिवसेना विभाग कसबा बावडा, भुयेवाडी ग्रामदैवत श्री.भैरवनाथ मंदिर येथे शाखा भुयेवाडी यांच्यावतीने राज्याची प्रगती होवो, असे साकडे घालून महाभिषेक करण्यात येणार आहे. शिवसेना जिल्हा व शहर कार्यकारणीच्या वतीने सायंकाळी ७.०० वाजता शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शनिवार पेठ येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
यानंतर शिवसेना विभाग राजारामपुरी यांचे वतीने पांजरपोळ येथील गो- शाळेस चारावाटप करण्यात येणार आहे. यासह आर.के.नगर येथील मातोश्री वृधाश्रम येथे फळेवाटप करण्यात येणार आहे. शिवसेना विभाग उत्तरेश्वर पेठ व शुक्रवार पेठ यांच्यावतीने गंगावेश चौक येथे गरजूंना खिचडी वाटप करण्यात येणार आहे. शिवसेना कोल्हापूर दक्षिण विभागाच्यावतीने चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे फळेवाटप करण्यात येणार आहे. शिवसेना विभाग जुना बुधवार पेठ यांच्यावतीने विवेकानंद शाळा जुना बुधवार पेठ येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यासह मिरजकर तिकटी येथील अंधशाळा येथे विद्यार्थ्यांना फळेवाटप करण्यात येणार आहे.
शिवसेना शाखा भुयेवाडी यांच्या वतीने कन्यामंदिर भुयेवाडी येथील विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात येणार आहे. सोनतळी येथील वि.म.लोहिया कर्णबधीर विद्यालय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यासह जयभवानी गल्ली, भुयेवाडी येथे शेतकरी बांधवासाठी शासकीय योजनांची माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासकीय योजनांच्या माहितीसह आधारकार्ड, पॅनकार्ड, श्रमिक कार्ड आदी शासकीय योजनांची माहिती व दुरस्ती करण्यात येणार आहे.यासह बाळासाहेबांची शिवसेना १५ शाखांचे उद्घाटन या आठवड्यात करण्यात येणार आहे. शिवसेना विभाग प्रतिभानगर यांच्यावतीने दि.१२ फेब्रुवारी रोजी स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना विभाग शिवाजी पेठ यांचे वतीने बी.जी.एम.स्पोर्ट्स येथे महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पेठ विभाग खंडोबा तालीम यांचेवतीने महाराष्ट्र हायस्कूल मैदान येथे सब.ज्युनियर फुटबॉल स्पर्धेचे, शिवाजी पेठ विभाग जय भवानी स्पोर्ट्स यांचे वतीने टर्फ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना दक्षिण विभागाच्या वतीने दि.१२ फेब्रुवारी रोजी फुलेवाडी रिंगरोड गंगाई लॉन येथे मोफत नेत्र शिबिराचे आणि साळोखेनगर सुर्यकांत मंगल कार्यालय येथे महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना विभाग शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ यांच्या वतीने उत्तरेश्वर थाळी उपक्रमास ग्रायंडर मशीन भेट दिले जाणार आहे.कसबा बावडा विभागातर्फे “एकनाथ चषक” भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दि.१४ ते २० फेब्रुवारी २०२३ दरम्यान पॅव्हेलियन ग्राउंड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचा ट्रॉफी अनावर सोहळा उद्या सायंकाळी ७.३० वाजता शिवनेरी विभागीय कार्यालय कसबा बावडा येथे पार पडणार आहे. यासह केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
Leave a Reply