काकासाहेब चितळे यांच्या पुण्यस्मरणनिमित्त जायंट्स ग्रुपतफेँ विविध सामजिक उपक्रम

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : जायंट्स रत्न व सर्वसामान्यांचे आधारवड सर्वांना आपलंसं वाटणारे ज्येष्ठ उद्योगपती कै. काकासाहेब चितळे यांना तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त जायंटस गृप ऑफ कोल्हापूर शिव समर्थ तफेँ फोटो पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले होते.यामध्ये मोफत मधुमेह शिबिर शितोळे हाॅस्पिटल मध्ये घेण्यात आले त्या मध्ये मोफत रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी करण्यात आली.मोफत ECG करण्यात आले.संदिप कुंभार यांनी गरजूंना मोफत औषधे वाटप केली.ईलाईट यंग जायंट्स गृप ऑफ कोल्हापूर शिव समर्थ तफेँ सुय॔नमस्कार प्रात्यक्षीक घेण्यात आले. यावेळी अध्यक्ष संदिप कुंभार, डाॅ शितोळे परिवार,कर्मचारी आणि इतर सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!