
कोल्हापूर/प्रतिनिधी :बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेवून कार्यरत असलेल्या व ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ म्हणून गौरविलेल्या उचगांव येथील ‘न्यू पॉलिटेक्निक’ आणि ‘वनश्री पुरस्कार’ सन्मानित ‘अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स असोसिएशन, कोल्हापूर’ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे.न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे आणि अर्थमुव्हर्सचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी या करारावर सह्या केल्या आहेत.या कराराद्वारे विद्यार्थ्यांना अर्थमुव्हींग मशिनरीचे ऑपरेशनल ट्रेनिंग व रिपेअर्स, टेक्निकल प्रोजेक्ट्स, विविध उपक्रम यासाठी संधी उपलब्ध होण्यासोबतच या क्षेत्रातील नोकरी-व्यवसाय सुरू करण्यासाठी असोसिएशनकडून पाठबळ मिळणार आहे अशी माहिती
न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे आणि अर्थमुव्हर्सचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षणसंस्था’ पुरस्कार प्राप्त श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या शतकमहोत्सवी संस्थेची न्यू पॉलिटेक्निक उचगांव ही एक नामांकित शाखा. तंत्रशिक्षणामध्ये दीपस्तंभ ठरलेल्या न्यू पॉलिटेक्निकचा उद्योग-व्यवसाय जगताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्ययावत व उपयुक्त असे तंत्रशिक्षण देण्यावर नेहमीच भर राहीला आहे. याच जोरावर न्यू पॉलिटेक्निकचे माजी विद्यार्थी शासकीय, निमशासकीय, बहुराष्ट्रीय कंपनीतील क्षेत्रात उच्चपदस्थ आहेत. शिवाय, हजारो विद्यार्थी आज यशस्वी उद्योजक व व्यावसायिक म्हणून घडले आहेत.
परस्पर सहकार्य व समाजाभिमुख विकास या मुल्यांवर कार्यरत असलेली आणि कोल्हापूर परिक्षेत्रातील प्रथितयश सिव्हिल व अर्थमुव्हींग काॅन्ट्रॅक्टर्स यांनी स्थापन केलेली अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स असोसिएशन ही संस्था नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. असोसिएशनचे दृष्टे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी समाजाच्या रचनात्मक विकासासाठी नामवंत व्यावसायिकांची असोसिएशनच्या माध्यमातून मोट बांधली. असोसिएशनच्या समाज विकासात्मक कार्याचा गौरव महाराष्ट्र शासनाने ‘वनश्री पुरस्कार’ प्रदान करून केला आहे.
या करारामुळे मुख्यत्वेकरून ऑटोमोबाईल, मेकॅनिकल व सिव्हिल इंजिनिअरींग विभागांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.शिवाय विद्यार्थ्यांना
अर्थमुव्हर्सच्या स्टाफ व ऑपरेटर्सना त्या क्षेत्रास पोषक असलेले मुलभूत टेक्निकल नाॅलेज, लॅब व एमसीईडी ट्रेनिंग न्यू पॉलिटेक्निकमध्ये दिले जाईल. त्याचबरोबर संयुक्तरित्या अर्थमुव्हींग मशिनरीचे प्रदर्शन भरवले जाणार आहे ज्याद्वारे विद्यार्थ्यांना अधिक माहिती मिळणार आहे.
यावेळी बोलताना अध्यक्ष रविंद्र पाटील म्हणाले की ‘विविध क्षेत्रात बहुतेक ठिकाणी न्यू पॉलिटेक्निकचे अभियंते उत्कृष्टरित्या सेवा देताना आम्ही पाहतोय. इथल्या भावी अभियंत्यांना अर्थमुव्हींग क्षेत्रातील तंत्रज्ञान व कौशल्ये खुली करून देण्याचे उद्दिष्ट असोसिएशनने बाळगले आहे.’
प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी जागतिक व सामाजिक पातळीवरील गरजा पुरवण्यास सक्षम असे अतिउत्कृष्ठ शैक्षणिक केंद्र म्हणून न्यू पॉलिटेक्निकची उभारणी करण्याचा मानस असून हा करार त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले.
ऑटोमोबाईल विभागातील प्रा. रोहन देसाई हे या कराराद्वारे होणाऱ्या विविध उपक्रमांसाठी समन्वयक म्हणून काम पाहणार असून रजिस्ट्रार प्रा. नितीन पाटील यांनी या करारामध्ये निमंत्रक म्हणून भुमिका पार पाडली. ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. सुहासचंद्र देशमुख, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील, सिव्हिल विभागप्रमुख प्रा. सुभाष यादव यांनी या सामंजस्य करारासाठी कष्ट घेतले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष संजय नाळे, अभय देशपांडे, अतुल मूग, मदन अष्टेकर, राजाराम मगदूम, श्रीकांत घाटगे, अरुण पाटील, संजय कसबेकर, संतोष घोरपडे, सुंदर तोरसकर, मिलिंद गावडे, विजय कोंडेकर, अमोल पाटील, संजय पाटील, सुरज बोडके, सतीश घाटगे, संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील, व्हा. चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजानीस वाय. एस. चव्हाण, न्यू पॉलिटेक्निकमधील विभागप्रमुख उपस्थित होते.
Leave a Reply