
कोल्हापूर: केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन गेल्या महिन्याभरापासून चालू आहे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांची एकत्रित मोट बांधण्याचे काम चालू आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन अमित शाह यांचे स्वागत करूया व त्यांचा दौरा यशस्वी करूया असे आवाहन हॉटेल आयोध्या येथील बैठकीमध्ये केले. भाजपमधील देखील काही नाराज कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना समजूत घालून त्यांना एकत्रितपणे काम करण्याची उर्मी खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. आजचा अमित शाह यांच्या दौरा यामुळे संपूर्ण भाजपच्या कार्यकर्त्यांना एक स्फूर्ती मिळेल. आणि सर्व भाजप पुन्हा एकदा चार्ज होईल. या दौऱ्यामुळे सर्व भाजप कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने कामाला लागले असून संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हा भाजपमय झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपचा एकही आमदार किंवा खासदार नाही. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही भाजप चा पराभव झालेला आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्व धुरा खासदार धनंजय महाडिक यांच्या खांद्यावर आहे.
Leave a Reply