लोकोत्सव’ प्रदर्शन येणाऱ्या आगामी पिढीसाठी मार्गदर्शक: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

 

कोल्हापूर: श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ प्रदर्शन येणाऱ्या आगामी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.या प्रदर्शनाचे दृष्य परिणाम लवकरच दिसून येतील. हे प्रदर्शन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील ‘आत्मनिर्भर भारताचे’ प्रतिबिंब असल्याचे गौरवोग्दार काढून भारत विश्व गुरु होण्यासाठी येथे उपस्थित असलेल्या साधु संतांचे आशिर्वाद मिळावेत असे सांगून मुदत संपल्यानंतरही हे प्रदर्शन आणखीन पाच दिवस सुरु ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

श्री क्षेत्र गुंटूचे शिवाराथी देशिकेंच्या महास्वामी अध्यक्षस्थानावरुन बोलताना म्हणाले की, पंचमहाभूताचे अस्तित्व कोणालाही नाकारता येणार नाही. निसर्गाचे रक्षण करणे हे सर्वांचे परम कर्तव्य आहे. पृथ्वी प्रदूषित करण्याला जेवढे हात कारणीभूत आहेत त्याच्या दुप्पट हातांनी पृथ्वीचे पर्यायाने निसर्गाचे संवर्धन व्हावे, निसर्गाप्रती सर्वांच्या मनात आदर आणि जागृती निर्माण व्हावी. या संमेलनासाठी आतापर्यंत लाखो लोकांनी उपस्थिती दर्शविली यातच हा महोत्सव यशस्वी झाल्याचे दिसून येत असल्याचे गौरवोग्दारही त्यांनी यावेळी काढले.

हा महोत्सव यशस्वी केल्याप्रित्यर्थ सर्व साधु संतांच्या वतीने काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांचा वेद घोषाच्या मंत्रात यावेळी गणेश मूर्ती व शाल देवून राज्यपाल गेहलोत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भैय्या जोशी यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले.

प्रारंभी काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बागय्याजी यांनी तर आभार प्रदर्शन स्वामी परमानंद यांनी केले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात देशभरातून आलेल्या विविध जाती-धर्माच्या साधू संतांचे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांच्या अनुषंगाने चर्चासत्र संपन्न झाले.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!